येथील धनगई गल्लीतील रहिवासी गणेश शिंदे हे दि. २२ रोजी रात्री येथील बीएसएनएलजवळील खळ्यात बांधलेल्या जनावरांना रात्री ११ वाजता चारा टाकून घरी गेले व दि. २३ रोजी पहाटे ५ वाजता पुन्हा चारा टाकण्यास गेले असता गोठ्याच्या लोखंडी गेटची साखळी काढून गोठ्यातील दोन बैल, गाय, वासरू अशी एकूण ८४ हजार किमतीची गुरे चोरी गेल्याचे लक्षात आले. याबाबत शेतकरी गणेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिसांत अज्ञात चोरटयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भडगाव तालुक्यातील पोलीस व पोलीस पाटलांना पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी अलर्ट दिला असून, सजग राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वत्र गुरे चोरट्यांविरुद्ध गस्त सुरू आहे. मात्र, तरीदेखील चोरीच्या घटना वाढत आहेत.
भडगाव तालुक्यात गुरे चोरणारी टोळी सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:18 IST