शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मोहिमेचा जळगावातून शुभारंभ, जिल्ह्यातील 1250 रुग्णांना करणार मोतीबिंदूमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 13:07 IST

मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र संकल्पना प्रत्यक्षात साकारणार - गिरीश महाजन

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 23 - येत्या 18 महिन्यात राज्यातील 17 लाख मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करुन मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र ही मोहिम पूर्ण करण्यात येणार असून मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र संकल्पना प्रत्यक्षात साकारणार असल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षण तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. या मोहिमेचा शुभारंभ 23 नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयातून महाजन यांच्या उपस्थितीत झाला, त्या वेळी ते बोलत होते.   या वेळी आमदार बाळासाहेब सानप, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख, जळगावचे महापौर ललित कोल्हे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, जि.प. अध्यक्षा उज्‍जवला पाटील आदी उपस्थित होते. 

शेवटच्या रुग्णार्पयत सर्वाना तपासणार - डॉ. तात्याराव लहानेया वेळी बोलताना लहाने म्हणाले की, येथे येणा:या प्रत्येक रुग्णास, अगदी शेवटी जो राहिला असेल त्यालाही तपासण्यात येईल, असे डॉ. लहाने म्हणाले. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 1200 ते 1250 रुग्णांचे मोतीबिंदू काढण्यात येतील, असेही ते म्हणाले. 

या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 2 हजार रुग्णांची तपासणी एकाच दिवशी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयातील 5 वॉर्डात तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख स्वत: करणार आहे.   ज्या रुग्णांच्या डोळयात मोतीबिंदू आढळेल त्यांच्यावर 24 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपयर्ंत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शस्त्रक्रिया करताना दोन्ही डोळयांनी अंध, एका डोळयाने अंध व मोतीबिंदू फुटल्यामुळे काचबिंदू झालेल्या रुग्णांना प्राधान्य देण्यात येणार आहे.