शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

वसुलीसाठी थकबाकीदाराच्या घरासमोर वाजंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2017 15:04 IST

थकबाकीची रक्कम न भरणा:या थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल-ताशा वाजवून वसुली करण्याचा फंडा तळोदा नगरपालिकेच्या कर्मचा:यांकडून अवलंबिला जात आहे.

 तळोदा नगरपालिकेची फंडा : 144 जणांना दिली नोटीस

तळोदा, दि.26 : वारंवार सुचना तसेच नोटीस देऊन देखील थकबाकीची रक्कम न भरणा:या थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल-ताशा वाजवून वसुली करण्याचा फंडा तळोदा नगरपालिकेच्या कर्मचा:यांकडून अवलंबिला जात आहे. बदनामीच्या भीतीने का होईना पण थकबाकीदार रक्कमेचा भरणा करीत आहेत.
पालिका हद्दीतील नागरिकांकडे थकीत मालमत्ता कर वसुली  मोहिम पालिकेकडून सुरू आहे. यंदा विविध करांपोटी एक कोटी 20 लाख रूपयांचे उद्दिष्ट आहे. त्यातील 50 लाख म्हणजे 45 ते 50 टक्के वसुली करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आह़े नागरिकांकडील 100 टक्के वसुली करण्याचे शासनाचे आदेश असल्याने पालिकेकडून वसुली करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आह़े यात नवीन फंडा म्हणजे ढोल-ताशा वाजवून शुक्रवारपासून वसुली केली जात आहे. यात थकबाकीदाराच्या घरासमोर उभे राहून हे पथक ढोल-ताशा वाजवित आहेत. पालिकेच्या या अनोख्या फंडय़ामुळे वसुलीसदेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी एकाच दिवशी साधारण अडीच ते तीन लाख रूपयांची वसुली झाली. कर वसुलीसाठी हे पथक शहरातील प्रत्येक गल्लीत ढोल ताशांची वाजंत्री वाजवत फिरत असल्यामुळे साहजिकच कुणाकडे लगA अथवा हळदीचा कार्यक्रम आहे असे जाणून घेण्यासाठी बाहेर येतात. तेव्हा पालिकेचे वसुली पथक वाजंत्री वाजवून घरपट्टी वसूल करीत असल्याचे समजते. तेव्हा नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसतो.
विविध मालमत्ता कर वसुलीच्या 144 जणांना नोटीस
विविध मालमत्ता कर वसुली प्रकरणी शहरातील 144 जणांना नगरपालिकेने वसुलीच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यातील 14 थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाईदेखील केली आहे. त्यातील चार जणांनी जप्ती उठवून पालिकेची थकीत रक्कम भरल्याचे पालिकेत भरली आहे. थकीत वसुलीसाठी नगरपालिकेने थकबाकीदारांना वारंवार नोटीसा, सूचना देवूनही काही नागरिक वेळेवर घरपट्टी भरत नसल्याचे चित्र होते. मात्र पालिकेने वसुलीसाठी नवा फंडा   अवलंबविल्याने प्रतिष्ठेपायी वसुलीस चांगला प्रतिसाद मिळत आहे.