शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात घरकुलांमध्ये सट्टा अड्डयावर धाड, 27 हजाराची रोकड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 12:11 IST

पाच जणांना अटक

ठळक मुद्देअनेक जण पसार होण्यात यशस्वी झाले जिल्हाधिका:यांनी पोलीस प्रशासनाला कारवाईबाबत पत्र दिले होते

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29 -  जिल्हाधिका:यांनी भेट दिल्यानंतरही मनपाच्या घरकुलांमध्ये सुरु असलेल्या सट्टा अड्डयावर शनिवारी सायंकाळी एमआयडीसी पोलिसांनी धाड टाकून पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून 27 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पोलिसांच्या धाडसत्राने अनेक जण पसार होण्यात यशस्वी झाले. गेल्या आठवडय़ात जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त किशोर राजे निंबाळकर व महापौर ललित कोल्हे यांनी मेहरुणमधील घरकुलांमध्ये भेट दिली असता तेथे सट्टा, जुगार यासारखे अवैध धंदे चालत असल्याचे निदर्शनास आले होते. हा प्रकार पाहून जिल्हाधिका:यांनी पोलीस प्रशासनाला कारवाईबाबत पत्र दिले होते, मात्र तरीही पोलिसांनी या ठिकाणी कोणतीच कारवाई केलेली नसल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या पाहणीत आढळून आले होते. त्यामुळे ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित करुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर मनपा स्थायी समितीच्या सभेत हा मुद्या गाजला होता. या पाश्र्वभूमीवर शनिवारी सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, भरत लिंगायत, अशपाक शेख, दीपक चौधरी, नामदेव पाटील, शिवदास चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली. रामलाल कडू शिंदे (रा.तोंडापूर, ता.जामनेर), नामदेव नारायण पाटील, गोविंदा बळीराम टोंगळे, संजय श्रावण सोनार व बाळगीर द्रौणगीर गोसावी (सर्व रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सट्टा जुगाराचे साहित्या व 27 हजार 10 रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.