जळगाव : घर रिकामे करण्यासाठी शिवीगाळ करुन धमकावल्याप्रकरणी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्याविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला अदखपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गोविंद पंडित गायकवाड रा. गणपती नगर यांनी फिर्याद दिली आहे. गायकवाड यांचे वडिलोपार्जित घर त्यांच्या वडिलांनी सोनवणे यांना विक्री केले आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. हे घर खाली करावे यासाठी सोनवणे व अन्य तीन ते चार जणांनी गायकवाड यांना करण्यासाठी धमकी दिली, अशी फिर्याद त्यांनी दिली, त्यावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैलास सोनवणे यांच्याविरुध्द गुन्हा
By admin | Updated: October 11, 2015 01:05 IST