शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

 वाळू चोरीच्या गुन्ह्यात जळगावातील दोघांना एक वर्षाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 22:40 IST

वाळूची अवैध वाहतूक केल्याच्या प्रकरणात ट्रॅक्टर मालक संदीप पाटील (रा.कांचन नगर, जळगाव) व चालक चेतन सोनवणे (रा.हरिविठ्ठल नगर, जळगाव) या दोघांना न्यायालयाने बुधवारी एक वर्ष सक्तमजुरी व पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी शनी पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता.

ठळक मुद्दे जळगाव न्यायालयाचा निकालट्रॅक्टर चालक व मालकाचा समावेश दंडाचीही केली तरतूद

आॅनलाईन लोकमत जळगाव दि १४, :   वाळूची अवैध वाहतूक केल्याच्या प्रकरणात ट्रॅक्टर मालक संदीप पाटील (रा.कांचन नगर, जळगाव) व चालक चेतन सोनवणे (रा.हरिविठ्ठल नगर, जळगाव) या दोघांना न्यायालयाने बुधवारी एक वर्ष सक्तमजुरी व पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी शनी पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता.११ आॅगस्ट २०१३ रोजी शनी पेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी उमाकांत वाणी, कल्याण नाना कासार हे दोन्ही जण पेट्रोलिंगला असताना संदीप पाटील याच्या मालकीच्या ट्रॅक्टरमध्ये चेतन सोनवणे हा अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना आढळून आला होता. याप्रकरणी उमाकांत पाटील यांच्या फिर्यादीवरुन शनी पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्या. निलिमा पाटील यांच्या न्यायालयात हा खटला चालला. त्यात सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. त्यात उपनिरीक्षक गजेंद्र लोहार, कर्मचारी उमाकांत चौधरी आणि कल्याण कासार यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. पंच साक्षीदार बंडू परदेशी तसेच दगडू सपकाळे हे फितुर झाले. समोर आलेल्या पुराव्यावरुन न्यायालयाने टॅक्ट्रर मालक तसेच चालक अशा दोघांना चोरटी वाळूची वाहतुक प्रकरणी दोषी ठरविले. दोन्ही आरोपींना एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा तसेच ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला. दंडाची रक्कम न भरल्यास तीन दिवसांची साधी कैदेची तरतुद केली आहे. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. आशा शर्मा यांनी कामकाज पाहिले.