घोडे लपवून ठेवल्याप्रकरणी जळगावात पितापुत्रांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 12:17 IST
नगरसेवक इकबाल पिरजादे यांचा पुतण्या सोईल अहमद गसीउद्दीन पिरजादे (रा.मेहरुण) यांच्या मालकीचे हे घोडे आहेत.
घोडे लपवून ठेवल्याप्रकरणी जळगावात पितापुत्रांवर गुन्हा दाखल
ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 23 - मेहरुणमध्ये हाळवर पाणी पिण्यासाठी आणलेले घोडे घरी लपवून ठेवल्याप्रकरणी कॉँग्रेसचे माजी महानगराध्यक्ष उल्हास देवराम साबळे व त्यांचा मुलगा स्वपAील साबळे (दोन्ही रा.स्टेटबँक कॉलनी जवळ, जळगाव) या दोघांविरुध्द शुक्रवारी रात्री एमआयडीसी पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, नगरसेवक इकबाल पिरजादे यांचा पुतण्या सोईल अहमद गसीउद्दीन पिरजादे (रा.मेहरुण) यांच्या मालकीचे हे घोडे आहेत. 26 जून रोजी दुपारी चार वाजता सोईल हे घोडय़ांना पाणी पाजण्यासाठी हाळवर घेऊन गेले होते. रमजानचा महिना असल्याने नमाजची वेळ झाल्यामुळे या घोडय़ांना तेथेच सोडून ते नमाजसाठी निघून गेले. त्यानंतर हाळवर आले असता घोडे नव्हते. दोन दिवस शोध घेतल्यानंतर हे घोडे 28 जून रोजी उल्हास साबळे यांच्या घरी आढळून आले. त्यांना घोडय़ांचा ताबा देण्याबाबत विचारले असता साबळे यांनी 30 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर नगरसेवक इकबाल पिरजादे यांनीही त्यांच्या घरी जाऊन घोडे देण्याबाबत विनंती केली, मात्र त्यांच्याकडून नकार देण्यात आला.