शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ गोळीबार प्रकरणात आता पोलीस पुत्राची एन्ट्री

By admin | Updated: June 27, 2017 12:43 IST

एका आरोपीला अटक, दुसरा चौकशीसाठी ताब्यात

गणेश वाघ/ऑनलाईन लोकमत विशेष 

भुसावळ,दि.27 - शहरातील भारत नगरासह पवन नगरात टोळक्याने केलेल्या गोळीबारात जळगावातील जिल्हा पेठेतील एका पोलिसाच्या मुलाचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आह़े पोलीस सूत्रांनी मात्र हा तपासाचा भाग असल्याचे सांगत तो केवळ पोलिसांच्या नजरेतील संशयीत असल्याचे सांगितले आहे.
रविवारी रात्री  10़30 वाजेच्या सुमारास भुसावळच्या पवन नगरात गुन्हेगारांच्या टोळक्याने केलेल्या गोळीबारात निखील झांबरे गंभीर जखमी झाला होता तर भारतनगरात गावठी कट्टय़ातून तीन फैरी झाडण्यात आल्याने रहिवासी धास्तावले होत़े पोलिसांनी या प्रकरणी संशयीत आरोपी गौरव बढे, मुकेश भालेराव, नानु बॉक्सरसह अन्य तीन आरोपींविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला होता़
एकास अटक, दुसरा ताब्यात
पोलिसांनी श्यामल शशीकांत सपकाळे (कोळी) यास मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अटक केली. तर जळगाव येथून सुशील इंगळे (खळवाडी, भुसावळ) यास मंगळवारी सकाळी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल़े  संशयीताचा गोळीबार प्रकरणात सहभाग आहे किंवा नाही याबाबत चौकशी केल्यानंतरच काही सांगता येईल, असे सूत्रांनी सांगितल़े
गोळीबारात पोलिसाच्या मुलाचा सहभाग
जळगाव येथील जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये नियुक्तीला असलेल्याएका पोलीस कर्मचा:याच्या मुलाचा गोळीबार प्रकरणात सहभाग असल्याची दाट शक्यता आता पुढे येत आहे. त्या दृष्टीने या कर्मचा:याची मदत घेऊ त्याच्या मुलाचा शोध सुरू करण्यात आला़ सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या बाबीला दुजोरा दिला़ ते म्हणाले की, नानु बॉक्सर नावाचे दोन इसम असून दोघांचाही आम्ही शोध घेत आहोत़ त्यांना ताब्यात घेतल्यानंतर अधिक काही सांगता येईल़ संशयीताच्या शोधासाठी पोलीस असलेल्या वडिलांची मदत घेतली जात असून ते पोलिसांना सहकार्यदेखील करीत आहेत़