शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहतूक वाहनाने पाच भिक्षुकांना उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 11:58 IST

चालक वाहनासह पसार

ठळक मुद्देजखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार, रात्री पावणेआठ वाजेची घटना

जळगाव : सिंधी कॉलनीकडून पांडे चौकाकडे भरधाव जाणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनाने पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील शनिमंदिराजवळ बसलेल्या पाच भिक्षुकांना उडविल्याची थरारक घटना शनिवारी रात्री ७़४५ वाजता घडली़ ही घटना पाहून प्रत्यक्षदर्क्षींचा थरकाप उडाला. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला़ वाहनाचा क्रमांक काही नागरिकांना टिपून पोलिसांना दिला.पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील शनिमंदिराजवळ दर शनिवारी मोठ्या संख्येने भिक्षेकरी हे भिक्षेसाठी बसतात़ शनिवारी देखील मंदिराशेजारी पडलेल्या वाळूजवळ भिक्षेकरी बसलेले होते़ रात्री ७़४५ वाजेच्या सुमारास मालवाहतूक करणारे वाहन भरधाव वेगाने सिंधी कॉलनी परिसराकडून पांडे डेअरी चौकाकडे येत होते.या चारचाकीने भिक्षुकांच्या अंगावर वाहन घालत पाच जणांना उडवले़ यानंतर वाहनचालक पांडे डेअरी चौकाच्या दिशेने पसार झाला़ अपघातानंतर मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांची घटनास्थळी धाव घेतली़असे आहेत जमखींची नावेमालवाहतूक वाहनाच्या धडकेत मधुकर कोळी यांच्यासह जिजाबाई रमेश राजपूत (५५, रा़ दौलतनगर), बाबुलाल देवराव चावरे (६५, रा़ काव्यरत्नावली चौक परिसर), मधुकर रामचंद्र पाटील (६३, रा़ भुसावळ), शारदाबाई गणपत पारधे (६५, रा़ पांडे चौक परिसर) हे जखमी झाले आहेत़ यांच्या देखील डोक्याला, हाताला तसेच कमरेला मार बसला आहे़या जखमींवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार करण्यात आले़ काही जणांना उपचार करुन घरी पाठविण्यात आले.इतरानाही बसला मुकामार... या पाच जखमी भिक्षुकांहस आठ ते दहा भिक्षूक देखील त्या ठिकाणी बसले होते़ त्यातील दोन ते तीन महिलांना देखील वाहनाचा फटका बसल्यामुळे मुकामार बसला़ दरम्यान, घटनेनंतर त्या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी झालेली होती़पाच ते दहा फूट नेले फरफटतभरधाव वाहनाने मधुकर काळू कोळी (वय-६५, रा़ तुकाराम वाडी) यांना चक्क पाच ते दहा फूट फरफटत नेले़ त्यामुळे त्यांचे डोके आणि पायाला गंभीर ईजा झाल्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत ते जमीनीवर पडून होते़ अपघाताची माहिती मिळताच नगरसेवक मनोहर आहुजा, भूषण सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली़ त्यांनी व एमआयडीसी पोलीस स्टेशनेचे किशोर पाटील यांनी लागलीच जखमी पाच भिक्षुकांना वाहनात बसवून जिल्हा रूग्णालयात हलविले़