नंदुरबार : जिल्हा परिषदेत दोन महिन्यांपूर्वीच बदलून आलेले मुख्य लेखा व वित्त अधिकारी लिंगनवाड यांना शासनाने निलंबित केले आहे. बीड येथे असताना एका प्रकरणात त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे.शासनाने १४ अधिकार्यांचे एका प्रकरणात निलंबन केले आहे. त्यात लिंगनवाड यांचादेखील समावेश आहे. गेल्या अनेक वर्षानंतर जिल्हा परिदेला कॅफो मिळाले होते. परंतु दोनच महिन्यात त्यांच्या निलंबनामुळे हे पद पुन्हा रिक्त झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागात पुन्हा कामांची कसरत होणार आहे.
कॅफो निलंबित
By admin | Updated: July 24, 2015 20:08 IST