शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

कर्णकर्कश हॉर्न पोलिसांना ऐकू येत नाही का रे भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:14 IST

नागरिक हैराण : वर्षभरात शहरात केवळ ३७ वाहनधारकांवर कारवाई (- डमी - स्टार -- ८४७ “हॉर्न नॉट ओके प्लीज’) ...

नागरिक हैराण : वर्षभरात शहरात केवळ ३७ वाहनधारकांवर कारवाई

(- डमी - स्टार -- ८४७ “हॉर्न नॉट ओके प्लीज’)

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सिग्नलवर थांबल्यावर हिरवा दिवा लागायच्या अगोदरच कर्णकर्कश हॉर्नचे आवाज कानावर आदळतात. अनेकांना विनाकारण हॉर्न वाजविण्याची सवय जडली आहे. पूर्ण रस्ता काही सेकंदात मोकळा व्हावा, यासाठी हॉर्नवर हॉर्न वाजविण्याचा सपाटा सुरूच असतो. यामुळेही इतरांना नाहक त्रास सहन करावा लागतो. असे हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या आणि रस्त्यावरील इतर वाहनचालकांना अस्वस्थ करणाऱ्या प्रवृत्तीला लगाम घालण्याची गरज आहे.

मोटार वाहन कायद्याप्रमाणे वाहनांच्या हाॅर्नची तीव्रता कमी डेसिबल असावी, हे ठरलेले आहे; मात्र, मार्केटमध्ये अतिशय कर्णकर्कश आवाज करणारे हॉर्न उपलब्ध आहेत. बरेच जण चारचाकी किंवा मोठ्या ट्रकचा हॉर्न दुचाकीला लावतात. विशेष करून अल्पवयीन मुले व युवा वर्गांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आहे. दरम्यान, वाहतूक नियमांनुसार हॉर्न कधी व कशासाठी वाजवावेत, कुठे वाजवू नयेत, याची काही मार्गदर्शक तत्वे आहेत; पण या नियमांनाही धाब्यावर बसवत चालक हॉर्न वाजवतात.

कर्णकर्कश हॉर्न वाजविला तर...

- कर्णकर्कश हाॅर्न वाजविल्यामुळे कलम १९२ व १७७ प्रमाणे वाहतूक पोलिसांकडून वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत असते.

- कारवाईंतर्गत पाचशे रुपयांचा दंड वाहनधारकांकडून आकारला जाताे

- कर्णकर्कश हाॅर्न वाजविण्याचा प्रकार महामार्गावरदेखील अधिक प्रमाणात पहायला मिळतो.

- शाळा, महाविद्यालय परिसरात आपल्या वाहनांचे हॉर्न वाजवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे महाविद्यालय परिसर सायलेन्स झोन असूनही तेथे नियमांची सातत्याने पायमल्ली केली जाते.

फॅन्सी हाॅर्नची फॅशन

सध्या फॅन्सी हाॅर्नची फॅशन बघायला मिळत आहे. कार, ट्रक, खासगी बस अशा वाहनांकडून महामार्गावर म्युझिकल हॉर्न वाजविले जातात. महामार्गावर हॉर्नचा आवाज घुमतो. म्युझिकल हॉर्नला बंदी असूनही चालक हॉर्न बसवतात. आता तर बुलेटच्या सायलेन्सरने फटाके फोडणाऱ्या दुचाकीस्वारांचे पेव फुटले आहे. अशांवरसुध्दा कारवाई केली जात आहे.

कानाचेही आजार वाढू शकतात

हॉर्नचा गोंगाट अधिकच वाढला आहे. कर्णकर्कश तसेच फॅन्सी हॉर्न बसविण्यासह बुलेटसारख्या अन्य स्पोर्टस बाईकच्या सायलेंसरमध्येसुध्दा तांत्रिक बदल करून वेगळ्या पद्धतीचा फटाक्यांसारखा आवाज निर्माण करण्याच्या वाढलेल्या फॅडमुळे जळगावकरांना कानठळ्या बसत आहेत. कर्णकर्कश हॉर्नमुळे कानाचेही आजार जडतात. तसेच बहिरेपणादेखील येण्याची शक्यता असते.

१८ हजाराचा दंड वसूल

शहर वाहतूक शाखेच्यावतीने वर्षभरात कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्या ३७ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे १८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच ही कारवाई सुरूच असल्याची माहिती पोलिसांनी दिली, तसेच तांत्रिक बदल केलेले सायलेंसरसुध्दा जप्त करून संबंधित वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असल्याचीही माहिती शहर वाहतूक पोलिसांनी दिली.

सहा महिन्यातील अशी आहे कारवाई

विना हेल्मेट - १५१८९

ट्रीपल शीट -१०९९

नो पार्किंग - ८८१

फॅन्सी नंबर - २२

मोबाइलवर बोलणारे - १०५४

विना लायसन्स -१८८

कर्णकर्कश हॉर्न वाजविणारे - ३७ (वर्षभरातील)