शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बिनधास्त उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 22:49 IST

निवडणूक खर्च सादर करण्याबाबत उदासीनता

विजयकुमार सैतवालजळगाव : लोकसभा निवडणूक असो अथवा कोणतीही निवडणूक, आता ती लढविताना उमेदवारांना अनेक प्रशासकीय बंधने घातली असून त्याची पूर्तता करणे बंधनकारक केले आहे. असे असले तरी बहुतांश उमेदवार अजूनही या बाबत बिनधास्त असल्याचे लोकसभा निवडणुकीनिमित्ताने दिसून येत आहे. निवडणूक खर्च सादर करण्याबाबत सूचित करूनही ते सादर करण्याबाबत उदासीनता असल्याचे चित्र आहे. यामुळेच जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना नोटीस बजावण्यात आल्या.निवडणूक खर्च सादर न करणे, हिशेबात तफावत, झालेल्या कार्यक्रमांच्या खर्चाबाबत माहिती न देणे अशा विविध कारणांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जळगाव लोकसभा मतदार संघातील आठ जणांना नोटीस काढल्या. विशेष म्हणजे यात जळगाव लोकसभा मतदार संघाचे युतीचे उमेदवार उन्मेष पाटील, आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर या प्रमुख उमेदवारांसह प्रमुख पक्षाच्या आमदार स्मिता वाघ, आमदार डॉ. सतीश पाटील यांचा व अपक्ष तसेच इतर पक्षांच्या उमेदवारंचा समावेश होता.निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसह उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रत्येक उमेदवाराने तसेच उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारानेही आपला निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक असताना दोन्ही मतदार संघातील उमेदवार, निवडणुकीतून माघार घेतलेल्यांनी निवडणूक खर्च सादर न केल्याने त्यांना नोटीस बजावल्या. यात कोणी मंडपाचे दर सादर करताना ते शासकीय दरानुसार न दाखविता कमी दराने दाखविल्याचा प्रकार समोर आला. दुसºया एका प्रकारात उमेदवाराच्या खर्चासंदर्भात निरीक्षण नोंद वहीनुसार खर्चाची नोंद नसल्याने नोटीस काढण्यात आली. आणखी एक प्रकार म्हणजे पक्षाच्या कार्यक्रमाचा खर्च उमेदवाराने केला की उमेदवाराने केला, याबाबत नेमका खुलासा नसल्याचेही लक्षात आले. एका उमेदवाराने तर निवडणूक खर्चासाठी बँक खाते उघडले, मात्र त्या खात्यातून खर्च न करता स्वत: जवळील रोख रक्कम खर्च केल्याचेही दिसून आले. माघार घेतलेल्यांनी याबाबत लक्षच दिले नाही. उमेदवारी दाखल झाल्यापासून माघार घेईपर्यंत त्यांनी खर्च सादरच केला नाही. काही जणांनी तर खर्च तपासणीस दांडीच मारली. निवडणूक लढविण्याºया उमेदवारांनी आपली निवडणूक खर्च हिशोब नोंदवही घेऊन निवडणूक खर्च शाखेत स्वत: अथवा प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्यासंदर्भात सूचित करूनही ते उपस्थित राहिले नाही. त्यामुळे उमेदवार प्रशासकीय पूर्ततेबाबत किती बिनधास्त आहे, हे लक्षात येते.

टॅग्स :Jalgaonजळगाव