शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावात साडेतीनशे महिलांची कॅन्सर तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 01:33 IST

चाळीसगाव येथील मारवाडी युवा मंचतर्फे शहरातील तब्बल साडे तिनशे महिलांची कॅन्सर तपासणी करण्यात आली. त्याबद्दल नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी मंचचे कौतुक केले

ठळक मुद्देतीन दिवसात ७२ महिलांची मॅमोग्राफी तर २०२ महिलांची पॅपस्मिअर कॅन्सर तपासणीमान्यवरांची शिबिराला उपस्थिती आणि मंचाचे कौतुक

चाळीसगाव : संपूर्ण जगात आज कॅन्सरची भीती मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ घातली आहे. त्यातच महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. स्तनाचे कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर याबाबत महिलांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. आजच्या शिबिरात मोठ्या प्रमाणावर महिलांनी आपली तपासणी करून घ्यावी, ही संधी उपलब्ध करून देणाऱ्या मारवाडी युवा मंचचा हा उपक्रम अभिनंदनीय असल्याची भावना नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी येथे व्यक्त केली.मारवाडी युवा मंचच्या वतीने शहरातील बापजी रुग्णालयाच्या आवारात तीन दिवसीय मेमोग्राफी व पॅपस्मिअर कॅन्सर तपासणी शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून महिलांची तीन दिवस तपासणी करण्यात आली. यात साडे तीनशे महिलांची तपासणी करण्यात आली. श्री पद्मावती वात्सल्य निधी ट्रस्ट , जैन डॉक्टर असोसिएशन चाळीसगाव मारवाडी युवा मंच तसेच पूनम फरसाणचे संजय अग्रावत, डॉ . सुवालाल छाजेड फाउंडेशन यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवण्यात आला. दररोज फक्त शंभर महिलांची तपासणी शक्य असल्याने शहरातील विविध भागातील महिलांची तपासणी करण्यात आली. गेल्या तीन दिवसात ७२ महिलांची मॅमोग्राफी तर २०२ महिलांची पॅपस्मिअर कॅन्सर तपासणी निशुल्क करण्यात आली. या उपक्रमासाठी पद्मावती वासल्य ट्रस्ट अध्यक्ष दिपा शहा, रेखा मोमाया, नीलम मोमाया, हेमल पोलडिया, सुनीता कासार यांनी परिश्रम घेतले तर तपासणी शिबिराचा समारोप बाबजी ट्रस्टचे अध्यक्ष नरेश जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जैन असोसिएशनचे डॉ. अशोक जैन (आचलिया) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष समकित छाजेड, समितीचे सचिव पंकज दायमा सदस्य संजय अग्रावत, योगेश खंडेलवाल, अजय जोशी, प्रमोद दायमा, मनोज चव्हाण, बाळासाहेब सोनवणे, सुनील वाणी, जितेंद्र राजपूत हेमलता शर्मा, योगिता छाजेड , धीरज लोढाया, नमिता अग्रावत , डॉ ईश्वर खाबिया आदींनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Medicalवैद्यकीय