शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ व बांभोरी येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 13:51 IST

दोन दिवसात चार परवाने रद्द : वाढत्या तक्रारींमुळे कारवाईचा धडाका

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : लाभार्थ्यांना धान्य न देणे, दुकानात फलक नसणे, धान्य साठ्यात तफावत अशा वेगवेगळ््या कारणांनी  भुसावळ व धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील   स्वस्त धान्य दुकानांचे परवाने जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी रद्द केले.  स्वस्त धान्य दुकानांच्या तक्रारी वाढतच असल्याने कारवाईंचा धडाका लावून दोन दिवसात चार दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. भुसावळ येथील स्वस्त धान्य दुकानाच्या बाबतीत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते, त्यानंतर तेथे तपासणी करण्यात आली. भुसावळ येथील जुना सातारा, कडू प्लॉट भागातील एस.बी. लोखंडे यांचे स्वस्त धान्य दुकान क्रमांक १२ या दुकानांबाबत तक्रारी वाढत असल्याने या संदर्भात ‘लोकमत’ने ५ एप्रिल रोजी वृत्त प्रकाशित केले होते, त्यानंतर तेथे तपासणी करण्यात आली. त्या वेळी तेथे आवश्यक ते फलक नसणे, परवाना अद्यायावत केलेला नाही, शिल्लक धान्य साठ्यात तफावत अशा अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे या दुकानाचा परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांनी दिले. या सोबतच धरणगाव तालुक्यातील बांभोरी प्र.चा. येथील स्वस्त धान्य दुकानदार गुलाब हिरालाल फुलझाडे हे धान्य वितरीत करीत नाही, ठरवून दलेल्या दरापेक्षा जास्त दराने धान्य देतात, लाभार्थ्यांशी अरेरावी, पावती देत नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगची व्यवस्था केलेली नाही, दप्तरात अनियमितता, महिन्यातील काही दिवसच दुकान उघडे ठेवले जाते, अशा वेगवेगळ््या तक्रारी आल्याने सदर दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला.

दोन दिवसात चार परवाने रद्द जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांच्या तक्रारी वाढतच असल्याने कारवाईंचा धडाका लावून दोन दिवसात चार दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. यामध्ये शुक्रवार, १० एप्रिल रोजी रावेर तालुक्याकील सावदा येथील व अमळनेर तालुक्यातील दापोरी बुद्रुक येथील स्वस्त धान्य दुकानांचे परवाने रद्द झाल्यानंतर दुसºया दिवशी शनिवार, ११ एप्रिल रोजी  भुसावळ व धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील स्वस्त धान्य दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले.