शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जन्मपूर्व निदान कायद्याखाली दाखल गुन्हा खंडपीठात रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 20:57 IST

डॉ. स्मिता पाटील यांना दिलासा : अभ्यास न करता घाईने केलेली कारवाई

चोपडा : येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्मिता पाटील यांच्या विरुद्ध गर्भधारणा आणि जन्मपूर्व निदान कायद्यानुसार दाखल गुन्हा व कारवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्दबातल केली आहे.शहरातील शरदचंद्रिका आक्का मॅटर्ननिटी हॉस्पिटलमध्ये ८ नोव्हेंबर २०११ रोजी उपजिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक प्रमुख असलेल्या पथकाकडून संशय व घाईघाईने केवळ एफ फॉर्म भरला नाही म्हणून सोनोग्राफी मशीन सील केले होते. तसा पंचनामा केला होता. त्यावरून १२ मार्च २०१२ रोजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील यांनी चोपडा न्यायालयात डॉ. स्मिता पाटील यांच्याविरोधात कलम ४(३), ५, ६, २० सह कलम २८ च्या पूर्व गर्भधारणा आणि पूर्व जन्म निदान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. मात्र औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दाखल गुन्हा व केलेली कारवाई रद्दबातल केली आहे.पथकाने परिस्थिती समजून न घेता व सामर्थ्यशाली बाजूंची तपासणी न करता पूर्वग्रह दूषित हेतू ठेऊन गुन्हा दाखल केला,असा आरोप करीत या अन्यायाविरोधात अमळनेर येथील न्यायालयात डॉ.स्मिता पाटील यांनी धाव घेतली होती व न्यायालयात २७ आॅगस्ट २०१३ रोजी रिव्हिजन दाखल केले होते. मात्र अमळनेर न्यायालयाने ते रिव्हिजन खारीज केले होते. त्यास आव्हान देत डॉ. पाटील यांनी लागलीच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर औरंगाबाद येथील न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी अमळनेर व चोपडा न्यायालयांचे निर्णय रद्द करून तत्कालीन पथकातील अधिकारी यांनी ही घाईघाईने केलेली कारवाई असल्याचे स्पष्ट करून डॉ.पाटील यांच्या बाजूने निकाल दिला आहे. तत्कालीन तपासणी पथकात वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील हे स्वत: न जाता अधिकार नसलेले वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज पाटील यांना मशीन सील करण्याचा व पंचनामा करण्यास पाठविले होते. सदस्य म्हणून एनजीओ वासंती दिघे, तत्कालीन नायब तहसीलदार चंद्रजित राजपूत, डॉ.व्ही. एस. अलुरे यांचा समावेश होता. पथकातील सदस्य डॉ. अलुरे यांची पंचनाम्यावर स्वाक्षरी नसल्याने ते हजर नसल्याचे स्पष्ट झाले. म्हणून डॉ.स्मिता पाटील यांनी कायद्याचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन केले नसून वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील यांनी घाईगर्दीने व सामर्थ्यशाली बाजूंची तपासणी न करता ही कारवाई केली आहे, हे स्पष्ट झाल्याने डॉ. स्मिता पाटील यांच्या बाजूने निकाल दिला आहे. डॉ. पाटील यांच्यातर्फे अ‍ॅड. बी. आर. वर्मा यांनी अनेक मुद्दे गैर असल्याचे स्पष्ट करून केलेली कारवाई चुकीची असल्याने गुन्हा रद्दबातल होण्यासाठी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालय