शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या रकमेतून रिक्षाची खरेदी

By admin | Updated: August 26, 2014 14:50 IST

हर्षवर्धन सुदाम पवार (रा.गेंदालाल मिल) याला जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी.पथकातील कर्मचार्‍यांनी सोमवारी अटक केली. चोरीच्या पैशांमधून घेतलेली रिक्षा व साहित्य पोलिसांनी जप्त केले.

आरोपीस अटक : जिल्हापेठ पोलिसांची कामगिरी

 
जळगाव : नाथवाडा भागातील मदनलाल जैन यांच्या उघड्या घरातून ७0 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्या प्रकरणातील आरोपी हर्षवर्धन सुदाम पवार (रा.गेंदालाल मिल) याला जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी.पथकातील कर्मचार्‍यांनी सोमवारी अटक केली. चोरीच्या पैशांमधून घेतलेली रिक्षा व साहित्य पोलिसांनी जप्त केले.
गेल्या आठवड्यात जोशी कॉलनी जवळील नाथ वाड्यातील रहिवासी मदनलाल जैन यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने ७0 हजार रुपयांची रक्कम गायब केली होती. या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. 
या गुन्ह्यातील आरोपीबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक गिरधर निकम, कर्मचारी रवी नरवाडे, राजेश मेढे, भांडारकर, अनिल पाटील, अलताफ पठाण यांना गुप्त माहिती मिळाली. आरोपी हर्षवर्धन पवार याच्या संशयास्पद हालचाली असल्याने त्यांनी ही बाब पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांना सांगितली. 
त्यांनी पथकाला कारवाई करण्याची सूचना दिली. त्यानुसार या पथकाने हर्षवर्धन सुदाम पवार याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याने मदनलाल जैन यांच्याकडे चोरी केल्याची कबुली दिली. 
या चोरीच्या रकमेतून त्याने ४२ हजार रुपये डाऊन पेमेंट भरून एक रिक्षा घेतली होती. यासह रिक्षाचे टायर, ट्युब डिस्क व ज्ॉक विकत घेतले होते. उरलेल्या रकमेपैकी काही रक्कम त्याने बहिणीला रक्षाबंधननिमित्त भेटवस्तू स्वरूपात दिल्याची कबुली त्याने दिली.
जिल्हापेठ पोलिसांनी हर्षवर्धन याच्याकडून रिक्षा व अन्य साहित्य जप्त केले आहे. मुद्देमाल व आरोपीला औद्योगिक वसाहत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या आरोपीकडून आणखी काही चोर्‍या व घरफोड्या उघड होण्याची शक्यता आहे.