शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

व्यापा:यांनी गाळे स्वत:हून द्या अन्यथा ताब्यात घेणार - जळगाव मनपाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 13:07 IST

100 व्यापा:यांना उपायुक्तांनी दिल्या नोटीस : 30 दिवसांची मुदत; सुनावणीतील दावे फेटाळले

ठळक मुद्देपूर्वी दिली होती 10 दिवसांची मुदतगाळेधारकांची झाली सुनावणीफुले मार्केटमध्ये बजावल्या नोटीसा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 12 - 18 व्यापारी संकुलांमधील गाळे ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून शुक्रवारी महापालिकेने 81 ब च्या सुनावणीतील गाळेधारकांचा दावा फेटाळून लावत गाळे 30 दिवसात खाली करून द्या अन्यथा ते रिकामे (निष्काशीत) करून घेऊन ताबा घेऊ अशा नोटीसा उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांच्या स्वाक्षरीने गाळेधाराकांना बजाविण्यास शुक्रवारी सायंकाळी सुरूवात केली. या कारवाईमुळे गाळेधारकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबाद खंडपीठाने 14 जुलै रोजी गाळे करारप्रश्नी दाखल 4 वेगवेगळ्या याचिकांचा निकाल देत महापालिका प्रशासनास आदेश दिले होते की, 18 व्यापारी संकुलांमधील गाळे दोन महिन्यात रिकामे करून महापालिकेच्या ताब्यात घ्यावे व नंतर त्यांचा पुन्हा लिलाव करावा. या आदेशाबरोबरच महापालिकेत सुरू असलेली कलम 81 ब च्या सुनावणीची प्रक्रियाही पूर्ण करून घेण्याचे आदेश होते. दुस:या टप्प्याची झाली सुनावणीन्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका प्रशासनाने 81 ब ची नोटीस बजावलेल्या गाळेधारकांची सुनावणी घेण्याची प्रक्रिया 24 जुलैपासून दोन टप्प्यात सुरू केली होती. यात पहिला टप्पा 24 जुलै ते 1 ऑगस्ट असा होता. या टप्प्यात उपायुक्त  कहार यांनी सुनावणी घेतली. दुस:या टप्प्याची सुनावणी नगररचनाकार एस.एस. फडणीस यांनी घेतली. गाळे धारकांनी महापालिका अधिनियम 81 ब च्या सुनावणी दरम्यान सादर केलेले म्हणणे फेटाळून लावत त्यांना 30 दिवसांच्या आत गाळे रिकामे करून देण्याचे आदेश उपायुक्त  लक्ष्मीकांत कहार यांनी दिले आहेत. या आदेशांवर त्यांची स्वाक्षरी झाल्याने सायंकाळी एक पथक तयार करून नोटीसा बजावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात महात्मा फुले मार्केट मधील 100 गाळेधारकांना या नोटीसा बजावण्यात आल्या. महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, शास्त्री टॉवर, वालेचा मार्केट, छत्रपती शाहू मार्केट, जुने शाहू मार्केट व त्या जवळील व्यापारी संकुल, गेंदालाल मिल मार्केट, लाठी शाळेजवळील मार्केट, शिवाजी नगर दवाखान्याजवळील मार्केट, महात्मा गांधी मार्केट, भास्कर मार्केट, रेल्वे स्टेशन मार्केट, धर्मशाळा मार्केट, श्यामा प्रसाद मुखर्जी मार्केट, नानीबाई मार्केट, जुने बी.जे. मार्के ट मधील गाळेधारकांना दिलेल्या नोटीसीची प्रक्रिया आजअखेर पूर्ण झाली. 2012 मध्ये गाळ्यांची मुदत संपल्यानंतर 655 गाळेधाराकांना कलम 81 ब ची नोटीस देण्यात आली होती. त्यावर सुनावणी होऊन गाळेधारकांचे दावे त्यावेळीही फेटाळण्यात आले होते. त्यावेळी गाळे ताब्यात देण्याची मुदत 10 दिवस देण्यात आली होती. त्यानंतर चंद्रकांत फातले हे उपायुक्त असतानाही सुनावणी झाली होती मात्र फातले यांच्यावर कारवाई झाल्याने त्यांच्याकडील निर्णय बाकी होता. त्यामुळे 1732 गाळेधारकांना पुन्हा सुनावणीस पाचारण करण्यात आले.