जळगाव- भुसावळ तालुक्यातील साकेगावजवळ दुपारी ३ वाजेच्या सुमारास जळगाव जामोद आगाराची बस डंपरला धडकून झालेल्या अपघातात बसचालक जखमी झाला आहे़जळगाव जामोद -धुळे बस(एम़एच़ १९,९६९) साकेगावहून चालली होती़ डपंरने समोरील मोटारसायकल स्वाराला वाचविण्यासाठी अचानक ब्रेक मारल्याने बस डंपरला जाऊन धडकली़ या अपघातात बसचालक ज्ञानेश्वर एस़पाटील यांचा पाय क्षतीग्रस्त झाला़ त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले़ तेथून डॉ़प्रताप जाधव यांच्या रुग्णालयात हलविण्यात आले़
साकेगावजवळील अपघातात बसचालक जखमी
By admin | Updated: May 29, 2014 16:10 IST