शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

संगमनेर अपघातातील तिघांचा जामनेर येथे शोकाकुल वातावरणात दफनविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 18:20 IST

संगमनेरजवळील हंगेवाडी शिवारात गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात येथील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला.

ठळक मुद्देकुटुंबियांसह नागरिकांची झाली गर्दीतिघांचे मृतदेह कब्रस्तानाजवळ एकत्र येताच कुटुंबियांना अश्रू अनावर

जामनेर, जि.जळगाव : संगमनेरजवळील हंगेवाडी शिवारात गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात येथील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. शुक्रवारी सकाळी ६ वाजता तिघांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून येथे आल्यावर नागरिकांनी एकाच गर्दी केली. तिघांचे मृतदेह कब्रस्तानाजवळ एकत्र येताच कुटुंबीयांना अश्रू आवरता आले नाही. तिघांचा शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला.कापूस खरेदीसाठी व्यापाऱ्याच्या गाडीवर हमालीसाठी गेलेले शेख परवेझ शेख नासिर, शेख जुनेद शेख भिकन व शेख फरमान शेख हारून हे हंगेवाडीकडून परत येत असताना वाहन उलटले. त्यात ते त्याखाली दाबले जाऊन गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.शुक्रवारी सकाळी ९ वाजता तिघांवर एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले. उपस्थित नातेवाईकांसह नागरिकांना अश्रू अनावर होत होते. माजी मंत्री गिरीश महाजन, माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी,उपनगराध्यक्ष अनिस शेख, कैलास शर्मा, शंकर राजपूत, प्रफुल्ल लोढा, विलास राजपूत, प्रल्हाद बोरसे आदी उपस्थित होते.शेख फरमान हा पाच बहिणीतील एकुलता एक भाऊ होता. तिघांचे कुटुंबीय मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे होते. या दुर्दैवी घटनेने इस्लामपूर व घरकुल परिसरात शोककळा पसरली होती.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमJamnerजामनेर