शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबिय झोपलेले असताना घरात डल्ला मारणारा चोरटा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:13 IST

फोटो : ४.४७ वाजेचा मेल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कुटुंबिय झोपलेले असताना घरात डल्ला मारून २६ हजार रूपयांची ...

फोटो : ४.४७ वाजेचा मेल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कुटुंबिय झोपलेले असताना घरात डल्ला मारून २६ हजार रूपयांची रोकड व तीन मोबाईल लंपास करणा-या सराईत चोरट्यास पकडण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. गणेश बाबुराव कोळी (२४, रा.एमआयडीसी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक मोबाईल हस्तगत करण्‍यात आला आहे.

एमआयडीसीतील यश इंडस्ट्रीजच्या आवारात नुर मेहंदी हसन हे कुटूंबासह वास्तव्यास आहेत. २८ डिसेंबर २०२० रोजी हसन कुटूंब घरात झोपलेले असतान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात डल्ला मारत २६ हजार ५०० रूपयांची रोकड व साडे आठ हजार रूपये किंमतीचे तीन मोबाईल, असा एकूण ३५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी नुर मेहंदी हसन यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्‍यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस चोरट्याच्या शोध घेत होते.

कडगाव येथून अटक

घरफोडी करणारा चोरटा हा गणेश बाबुराव कोळी हा असून तो तालुक्यातील कडगाव येथे असल्याची माहिती गुरूवारी सायंकाळी एमआयडीसी पोलिसांना मिळाली. रात्री १० वाजता पोलिसांनी त्यास सापळा रचून अटक केली. कसून चौकशी केली असता, त्याने चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली व एक मोबाईल पोलिसांना काढून दिला.

३१ पर्यंत पोलीस कोठडी

शुक्रवारी पोलिसांनी संशयित चोरटा गणेश कोळी याला न्यायालयात हजर केले. सुनावणीअंती त्यास ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस कर्मचारी गफ्फार तडवी, अतुल वंजारी, सचिन पाटील, चेतन सोनवणे, इमरान सैय्य्द, मुदस्सर काझी आदींनी केली आहे.

दहा गुन्हे आहेत दाखल

गणेश हा सराईत गुन्हेगार आहे. याच्याविरूध्द विविध पोलीस ठाण्यांमध्ये दहा गुन्हे दाखल आहेत. फैजपूर पोलीस ठाण्यात २, नशिराबाद पोलीस ठाण्यात ३ तसेच भुसावळ पोस्टेला १ तर एमआयडीसी पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल आहेत.