शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पारोळ्यात दोन ठिकाणी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2017 00:26 IST

गुन्हा दाखल : भरदिवसा होत असलेल्या घरफोड्यांमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

पारोळा : शहरात घरफोडीचे सत्र सुरू झाले आहे. मंगळवारी भरदिवसा घरफोडी झाली होती. या घटनेला २४ तास उलटत नाही तोच बुधवारी पुन्हा चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी करून हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.मंगळवारी येथील डी.डी.नगर भाग २ मध्ये राहणारे अ‍ॅड.वेदव्रत काटे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी जवळपास ४५ हजारांचा ऐवज लंपास केला होता. कॉलनी भागात भरदिवसा झालेल्या या घरफोडीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.या घटनेतील चोरांचा तपास लागत नाही तोच चोरट्यांनी आज पुन्हा दोन ठिकाणी घरफोडी करून पोलीस यंत्रणेलाच आव्हान दिले आहे.बुधवारी  व्यंकटेशनगरातील प्रा. व्ही.एन. कोळी यांच्या कुटुंबातील सदस्य तामसवाडी येथे गेले होते. घराला कुलूप होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरांनी कपाटातील पाच हजार रुपये रोख, होम थिएटर, गॅस हंडी चोरून नेली.प्रा.कोळी यांच्या घरी तीन चोरटे कारने आले होते. ते गॅस हंडी कारमध्ये ठेवत असताना हंडी ठेवण्याचा जोरात आवाज झाला. तो आवाज ज्ञानेश्वर पाटील यांनी ऐकला. ते घरातून बाहेर येईपर्यंत चोरटे कारसह पसार झाले होते.दुसरी चोरीची घटना पारोळा-चोरवड रस्त्यावरील संजय दौलत महाजन यांच्या घरी घडली. ते साखरपुड्याच्या कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. घराला कुलूप असल्याचा फायदा चोरांनी घेतला. चोरट्यांनी घरातून पाच ग्रॅम सोने, तीन भार चांदीच्या अंगठ्या, ११ हजार रुपये रोख, होम थिएटर, मोबाइल असा जवळपास ४० हजारांचा ऐवज लंपास केला. या दोन्ही घरफोडीतून चोरट्यांनी जवळपास ६० हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे.पोलिसांकडून पाहणीया दोन्ही घरफोडीच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश चौधरी, सुनील साळुंखे आदींनी पाहणी केली. प्रा.व्ही.एन. कोळी यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक आर.जे. दहीहंडे  करीत आहेत. दिवसाही पेट्रोलिंग करावीशहरात सलग दोन दिवशी भरदिवसा घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी दिवसाही पेट्रोलिंग करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून आता व्यक्त होत आहे.          (वार्ताहर)