शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

जळगाव जिल्हा रुग्णालयात ‘ऑक्सिजन’चा बफर स्टॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 16:50 IST

उत्तर प्रदेशातील घटनेच्या पाश्र्वभूमीवर दक्षता : दररोज लागतात 20 ते 25 सिलिंडर

ठळक मुद्देजळगावातच प्रकल्पमहिन्याला 600 ते 700 सिलिंडरची आवश्यकतामनपा रुग्णालयातही स्थिती सामान्य

ऑनलाईन लोकमत / विजयकुमार सैतवाल

जळगाव, दि. 13 -  ऑक्सिजनचा ऐनवेळी तुटवडा भासून रुग्णांवर गंभीर प्रसंग ओढवू नये म्हणून जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरच्या पुरेशा साठय़ासह ‘बफर स्टॉक’ करून ठेवला जात आहे. सर्व कक्ष मिळून येथे दररोज 20 ते 25 सिलिंडर तर महिन्याला सुमारे 600 ते 700 सिलिंडरची आवश्यकता भासते, अशी माहिती जिल्हा रूग्णालयाच्या सूत्रांनी ‘लोकमत’ ला दिली.  उत्तरप्रदेशात ऑक्सिजन सिलिंडरच्या पुरवठय़ा अभावी जवळपास 63 बालकांना जीव गमवावा लागला. या पाश्र्वभूमीवर संपूर्ण जळगाव जिल्ह्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्थितीचा आढावा घेतला असता येथे सिलिंडर पुरेसे असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यासाठी रुग्णालयाच्यावतीने निविदा प्रक्रिया राबवून ठेका देण्यात आलेला आहे. वर्षभरासाठी हा ठेका असून दरवर्षी यासाठी निविदा काढल्या जातात. त्यानुसार संबंधित ठेकेदार ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करतो. जळगावातच प्रकल्पजिल्हा रुग्णालयाला पुरविण्यात येणारे ऑक्सिजन सिलिंडर हे जळगावातीलच प्रकल्पातून पुरविले जातात. सुरुवातीपासून रुग्णालयात कधी तुटवडा भासला नसल्याचे सांगण्यात आले. महिन्याला 600 ते 700 सिलिंडरची आवश्यकताजिल्हा रुग्णालयात दररोज 20 ते 25 ऑक्सिजन सिलिंडर आवश्यकता भासते. यामध्ये आपत्कालीन कक्षात सरासरी 10 व इतर कक्षात 10 ते 15 ऑक्सिजन सिलिंडरची गरज भासते. यात नवजात बालक कक्षातही पुरेसा साठा उपलब्ध ठेवला जातो, असे रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले. दर महिन्याला येथे 600 ते 700 सिलिंडर लागतात. त्यात कधी मोठे अपघात अथवा काही गंभीर  घटना घडल्यास सिलिंडरची ही संख्या वाढते. 

मनपा रुग्णालयातही स्थिती सामान्यजळगाव शहरातील महनगरपालिकेच्या रुग्णालयातही ऑक्सिजनची स्थिती सामान्य असल्याचे सांगण्यात आले. या रुग्णालयांमध्ये जिल्हा रुग्णालयासारखे जास्त ऑक्सिजनची गरज पडत नसल्याने सिलिंडर संपले की ते भरून आणले जाते. 

जिल्हा रुग्णालयात आवश्यक तेवढा ऑक्सिजन सिलिंडरचा साठा असतो. सोबतच आपत्कालीन प्रसंगासाठी बफर स्टॉक करून ठेवलेला असतो. कधी ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा भासत नाही व सध्याही पुरेसा साठा आहे. - डॉ. किरण पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक. 

मनपा रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असतात. तुटवडा भासत नाही. सध्याही सिलिंडर आहे. - डॉ. राम रावलानी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, मनपा रुग्णालय