शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांचा यंदा बफर स्टाॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:13 IST

चाळीसगाव : शेतकरी बांधवांनी रासायनिक खतांची चिंता करु नये. यंदा राज्य शासनाच्या कृषी विभागाने युरियाचा दीड लाख मेट्रिक टन ...

चाळीसगाव : शेतकरी बांधवांनी रासायनिक खतांची चिंता करु नये. यंदा राज्य शासनाच्या कृषी विभागाने युरियाचा दीड लाख मेट्रिक टन खतांचा बफर स्टाॅक केला आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी देवळी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिली.

शनिवारी सायंकाळी तालुका कृषी विभागामार्फत आयोजित शेतकरी अवजार बँकेचा शुभारंभ मंत्री भुसे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

देवळी येथील आत्माअंतर्गत स्थापित क्रांतिवीर रेशीम उत्पादक गटाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारांची अवजार बँक सुरु करण्यात आली आहे. गटाच्या सदस्यांनी एकत्र येऊन नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पोकरा अंतर्गत कमी अंतराच्या पिकांत व फळबागेत आंतरमशागतीस येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन लहान ट्रॅक्टर व त्यासोबत अवजारे स्वनिधीतून खरेदी केले व त्यासाठी शेड सुद्धा स्वनिधीतून बांधण्यात आले. यासाठी १८ लाख २२ हजार रुपयांचे कृषी अवजार सेवा केंद्राची स्थापना केली. गटाचे अध्यक्ष विवेक रणदिवे यांनी भुसे यांना माहिती दिली.

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी यनवाड, पंचायत समितीचे सभापती अजय पाटील, उपसभापती भाऊसाहेब पाटील, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, तालुका कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे, कृषी अधिकारी एम. एस. भालेराव, पल्लवी हिरवे, मंडळ कृषी अधिकारी संजय पगारे, तंत्रज्ञान व्यवस्थापक ज्ञानेश्वर पवार यांच्यासह देवळी, दडपिंप्री, आडगाव, पिंप्री, चिंचखेडे, डोणपिंप्री, भोरस आदी गावातील शेतकरी उपस्थित होते. उपस्थितांचे गटाचे अध्यक्ष विवेक रणदिवे यांनी आभार मानले.

......

चौकट

३१ लाख शेतकऱ्यांना २० हजार कोटीची कर्जमाफी

कृषिमंत्र्यांनी खुर्चीवर न बसता जमिनीवर बसून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. राज्यात कुठेही युरिया खताची टंचाई जाणवल्यास केवळ दोनच दिवसात त्याठिकाणी शासन युरिया उपलब्ध करून देईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कुठेही कृषी केंद्र चालकांकडून अडवणूक किंवा लुबाडणूक करण्यात येत असल्यास तत्काळ तक्रार करण्याचे व आपणास कळवण्याची सूचनादेखील दादा भुसे यांनी केली. ३१ लाख शेतकऱ्यांना वीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य शासनाने दिली आहे. उर्वरित वंचित शेतकऱ्यांनाही कोरोना संकटानंतर राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्याबरोबर कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. जंगली श्वापदांपासून शेतीच्या संरक्षणासाठी सरकारने पोकरा अंतर्गत शेतीला कुंपणाच्या योजनेत समाविष्ट करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने पद्माकर पाटील यांनी यावेळी केली.

===Photopath===

300521\30jal_5_30052021_12.jpg

===Caption===

चाळीसगावः देवळी येथे जमिनीवर बसून शेतकऱ्यांशी संवाद साधताना कृषी मंत्री दादा भुसे.