शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या ‘त्या’ नववधूची सबजेलमध्ये रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 20:39 IST

धरणगाव : तालुक्यातील बोरगाव येथील तरुणाशी लग्न करुन पोबारा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आचल अजय देशमुख रा.नागपूर हिच्यावर गुन्हा दाखल ...

धरणगाव : तालुक्यातील बोरगाव येथील तरुणाशी लग्न करुन पोबारा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आचल अजय देशमुख रा.नागपूर हिच्यावर गुन्हा दाखल झाला. धरणगाव पोलिसांनी तिला २९ रोजी येथील न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने तिचा जामीन अर्ज नामंजूर करुन सबजेलला रवानगी केली आहे.दरम्यान, पोलीसांनी तिच्यावर फसवणुकीची कलम वाढवली असून तपासात आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.या घटनेबाबत रवींद्र सुरेश पाटील रा.बोरगाव याने दिलेल्या फिर्यादीवरुन फसवणूक केल्याप्रकरणी आचल अजय देशमुख (रा.वार्ड क्र. ३, लता मंगेशकर रोड, भीमनगर, नागपूर हिच्या विरुध्द गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले होते. तपास अधिकारी सपोनि पवन देसले यांनी कलम ४२० वाढवून तिला धरणगाव न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश एस.डी.सावरकर यांनी तिचा जामीन अर्ज नामंजूर केला. त्यामुळे तिची रवानगी सबजेलला करण्यात आली आहे.या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी लग्नासाठी मध्यस्थी करणाºया आचलच्या नातेवाईकांचा शोध घेणे घेणे सुरु केले असून, त्यांनी अशा किती जणांना फसविले आहे, याची शहानिशा केली जात आहे. त्यामुळे तपासात आरोपी वाढण्याची शक्यता असल्याचे सपोनि देसले यांनी सांगितले. दरम्यान, बोरगावचे ग्रामस्थ आजही उत्सुकतेने न्यायालयात थांबून होते.या प्रकरणातील मुख्य आरोपींचे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणावे, अशी मागणी शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख जना भगवान पाटील, पप्पू पाटील, माजी सरपंच भालचंद्र मुन्ना पाटील, यांनी केली आहे.