शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

नोटाबंदी, संचारबंदीतही लाचखोरी जोरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:07 IST

जळगाव : भ्रष्टाचार कमी व्हावा किंवा बंदच व्हावा असे सर्वसामान्य नागरिकांना कितीही वाटत असले तरी बहुतांश यंत्रणा भ्रष्टाचाराने बरबटली ...

जळगाव : भ्रष्टाचार कमी व्हावा किंवा बंदच व्हावा असे सर्वसामान्य नागरिकांना कितीही वाटत असले तरी बहुतांश यंत्रणा भ्रष्टाचाराने बरबटली आहे. बोटावर मोजण्याइतकेच अधिकारी, कर्मचारी प्रामाणिपणे कार्य करून भ्रष्टाचारापासून चार हात लांब राहतात. यात सर्वात जास्त नुकसान व बळी पडतो तो सर्वसामान्य माणूस. आधी नोटाबंदी आणि आता कोरोना काळातील संचारबंदी या काळातदेखील लाचखोरी कमी झाली नाही.

नोटाबंदीच्या काळात तब्बल ४० सरकारी बाबू एसीबीच्या जाळ्यात अडकले तर आता कोरोनाच्या संचारबंदीतही दीड वर्षात ४१ जण जाळ्यात अडकले. क्लास वनपासून तर क्लास फोरपर्यंत महिलांपासून तर पुरुषांपर्यंत सर्वच यात अडकले आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणाऱ्या सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी असलेल्या महिलादेखील लाच घेत आहेत. २०१६ ते जुलै २०२१ या काळात तब्बल १६८ सरकारी अधिकारी, कर्मचारी लाच घेताना पकडले गेले, तर कोरोना व नोटाबंदीच्या काळात ८१ जण पकडले गेले आहेत. अवैध मार्गाने येणाऱ्या पैशांवर हौस, मौज व अनावश्यक उधळपट्टी होऊ लागली.

वर्ष लाच प्रकरणे

२०१६- ४०

२०१७- २६

२०१८- ३०

२०१९- ३१

२०२०- २०

२०२१ (जुलैपर्यंत)-२१

महसूल विभाग सर्वात पुढे

- लाचखोरीत सर्वाधिक महसूल विभाग पुढे आहे. त्याखालोखाल पोलीस विभागाचा नंबर लागतो. गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर पोलीस आणि महसूल या दोनच विभागात स्पर्धा दिसून येत आहे.

- गेल्या वर्षीच जळगावात कोरोना काळात महिला प्रांताधिकाऱ्यासह त्यांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच प्रकरणात अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षात सर्वात मोठी कारवाई ती होती. क्लास वनपासून तर क्लास फोरपर्यंत सर्वच संवर्गातील अधिकारी, कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले.

- कोरोना काळात कारवायांची संख्या गेल्या वर्षी घटली होती, यंदा मात्र त्यात मोठी वाढ झाली आहे. नोटाबंदीच्या काळात ४० जण एसीबीच्या जाळ्यात अडकले होते.

लाच दोनशेपासून चार लाखांपर्यंत

वाहन सोडण्यासाठी दोनशेची लाच...

महामार्गावर अडवलेले वाहन सोडविण्यासाठी वाहतूक नशिराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत चंद्रकांत पाटील व लक्ष्मण पाटील या दोन पोलिसांनी दोनशे रुपयांची लाच घेतली होती. २०१७ मध्ये ही कारवाई झाली होती. त्याशिवाय कुऱ्हे पानाचे, ता. भुसावळ येथील तलाठी प्रवीण मेश्राम याने वारस दाखला देण्याच्या मोबदल्यात २०० रुपयाची लाच घेतली होती.

शेतकऱ्यांना भूसंपादन रक्कम देण्यासाठी चार लाखांची लाच

अमळनेर तालुक्यातील पाडळसरे लाभ क्षेत्रासाठी संपादित झालेल्या शेतजमिनीचा मोबदला म्हणून ११० शेतकऱ्यांना रक्कम मंजूर झाली होती. ती देण्याच्या मोबादल्यात तापी पाटबंधारे विभागाचा कार्यकारी अभियंता सुरेश सावंत याने ४ लाख २५ हजार रुपयांची लाच घेतली होती. ही कारवाईदेखील २०१७ मध्येच झाली होती.

कोट...

सरकारी काम करून देण्यासाठी कोणताही अधिकारी, कर्मचारी लाच मागत असेल तर नागरिकांनी मनात कोणतीही भीती न बाळगता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. तक्रारदाराचे नाव कधीही समोर येत नाही. त्याशिवाय त्याचे अडलेले काम पूर्ण होतेच. लाचेची रक्कमदेखील परत मिळते. नि:संकोचपणे नागरिकांनी पुढे यावे.

- शशिकांत पाटील, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग