शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

वाढीव निधी अभावी नगरदेवळ्य़ाच्या विकास कामांना ‘ब्रेक’

By admin | Updated: May 19, 2017 16:55 IST

वारसा लाभलेले आणि देऊळांचे नगर म्हणून प्रसिद्ध असलेले नगरदेवळा गाव

श्यामकांत सराफ / ऑनलाइन लोकमतपाचोरा, जळगाव, दि. 19 -  तालुक्यातील सर्वात मोठे गाव आणि पाचोरा - भडगाव तालुक्याचा केंद्रबिंदू असलेले तसेच ऐतिहासिक  वारसा लाभलेले आणि देऊळांचे  नगर म्हणून प्रसिद्ध असलेले नगरदेवळा गाव विकासासाठी पाचोरा-भडगावचे आमदार किशोर पाटील यांनी  दत्तक घेतलेआहे. येथे विविध कामे  सुरू असली तरी ख:या विकासासाठी वाढीव निधीची गरज आहे.नगरदेवळा हे गाव तालुक्यात मोठे असले तरी विकास कामे हवी तशी झालेली नाही. या गावी पवार घराण्याचे संस्थान होते. श्रीमंत सरदार शिवराव पवार यांना ब्रिटिश सरकारने नगरदेवळा व परिसरातील 18 गावांची जहांगिरी, महसुली दिली होती. हे गाव आमदार किशोर पाटील यांनी दत्तक  घेतले. 15 हजारांवर लोकसंख्या असलेल्या या गावात सर्व समाजाचे वास्तव्य असून चार हजार 525 कुटुंबाचे हे गाव आहे. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणाहून अग्नावती नदी वाहते. या नदीवर अग्नावती मध्यम प्रकल्प बांधून पूर्वीच पाणी अडविल्याने नदीमध्येच बाजारपेठ सुरू झाली. अतिक्रमणामुळे नदीच नष्ट होऊन तेथे व्यवहार व्यापार होऊ लागले यामुळे गावाचे दोन भाग पडले. लोकसंख्या जास्त त्यात पंचक्रोशीतील 20 गावे लागून  यामुळे मोठी बाजारपेठ असल्याने प्रवाशांची सतत वर्दळ असते. मात्र येथे बसस्थानक नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागतो.   अग्नावती मध्यम प्रकल्प गावालगत  आहे. मात्र पाण्यासाठी नागरिकांना ससेहोलपट करावी लागते. पाण्याचा नेहमीच ठणठणाट जाणवतो. गावामध्ये एलईडी बल्ब, स्ट्रीट लाईट लावल्याने झगमगाट झाला.  काही दिवसांपूर्वीच आमदार निधीतून नवीन वस्तीत रस्ते काँक्रिटीकरण करण्यात आले.या सोबतच इतरही कामे करण्यात आली असून बरीच कामे प्रस्तावित आहे.  राज्य सरकारने दत्तक गाव घेण्याचे सांगितले. मात्र त्यासाठी वेगळा निधी ठरविला नाही. आमदार फंड हा संपूर्ण मतदारसंघासाठी असतो. नगरदेवळा गावासाठी वेगवेगळ्या माध्यमातून निधी उपलब्ध करून गावचे सर्व पक्षीय पदाधिकारी ग्रा.पं. सदस्य, संस्थांचे संस्था चालक यांची एकत्रित बैठक घेऊन गावचा विकास करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जात असून रस्ते, गटार, पाणीपुरवठा, दिवाबत्ती याकडे प्रामुख्याने लक्ष असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.