शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

कोरोनाची साखळी तोडा, डीजे जप्त करून वधू-वर पित्यावर गुन्हा दाखल करा-आमदार अनिल पाटील यांचे आढावा बैठकीत निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 17:02 IST

कोरोना साखळी तोडण्याचे आढावा बैठकीत आवाहन करण्यात आले.

अमळनेर : आपले गाव हिटलिस्टवर यायला नको. कोरोनाची साखळी तुटलीच पाहिजे. याकरिता २० मार्चपासून डीजे जप्त करा, वधू- वर पिता यांच्यावरही कारवाई करा, पोलिसांचे चेक पॉईंट लावा, भाजीपाला लिलावातील गर्दी बंद करा. बेजबाबदार समाजकंटकांमुळे जबाबदार नागरिकांना त्रास भोगावा लागत आहे. त्यामुळे कठोर पावले उचलून कारवाई करा, असे सक्त आदेश आमदार अनिल पाटील यांनी कोरोनाच्या आढावा बैठकीत प्रशासनाला दिला. दरम्यान, माजी आमदार साहेबराव पाटील यांनीही प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना या बैठकीत दिल्या.पंचायत समितीच्या सभागृहात सर्व प्रशासकीय विभागाची आढावा बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी बंद हाताळण्याबाबत सूचना दिल्या. तसेच यावेळी कोरोन्टाईन रुग्णांवर लक्ष ठेवणे, चाचण्या वाढवणे, कोविड केयर सेंटर अपूर्ण पडल्यास दुसरे सेंटर सुरू करणे, खाजगी दवाखान्यातील परिस्थिती, बसस्थानकात गर्दी, याबाबत आढावा घेण्यात आला. संचारबंदीबाबत चार अधिकारी नेमण्यात आले असून उद्घोषणा करण्यात येत आहे. बिना मास्कधारकांवर कारवाई वाढवण्यात येईल. अवैध व जादा प्रवाशी वाहतुकदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी सांगितले.विशेष म्हणजे रेमडेसीयरचे जास्त पैसे घेतले जात असतील तर त्या वैद्यकीय सेवाकर्त्यांवरदेखील कारवाई करा. नागरिकांनी देखील तहसीलदारांकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले.यावेळी डॉ.गिरीश गोसावी व.डॉ प्रकाश ताळे यांनी लसीची संख्या वाढवण्याची मागणी केली. केयर सेंटरला डॉक्टर व परिचारिका स्टाफ उपलब्ध करून देत असल्याची माहिती दिली.या बैठकीस आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, प्रांताधिकारी सीमा अहिरे, चोपड्याचे प्रभारी प्रांताधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, डॉ.राजेंद्र शेलकर, डॉ.आशिष पाटील, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, सहायक निबंधक गुलाबराव पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हेमंत महाजन, आगारप्रमुख अर्चना भदाणे, हरीश कोळी , पोलीस नाईक डॉ.शरद पाटील, होमगार्ड समादेशक अरुण नेतकर हजर होते.

आज आढळलेले रुग्ण १०५एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ५२५६ऍक्टिव्ह रुग्ण ३३९शहर २६१, ग्रामीण ७८कोविड हेल्थ सेंटर - ३९कोविड केयर सेंटर - ००

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmalnerअमळनेर