शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेमुळे मनपाच्या ३०० कोटींच्या कामांना ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 11:27 IST

मे नंतरच होणार कामांना सुरुवात

ठळक मुद्दे रस्त्यांच्या कामांनाही दीर्घ प्रतीक्षा

जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागल्यामुळे मनपाच्या ३०० कोटी रुपयांच्या विकासकामांना आता ‘ब्रेक’ लागला आहे. यामध्ये मलनिस्सारण योजनेच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या १९६ कोटी रुपयांचा कामांसह मनपाला नगरोथ्थानमधून मिळालेल्या १०० कोटींमधून होणाऱ्या कामांचा समावेश आहे. यासह ५ कोटी रुपयांच्या विशेष निधीमधून होणाºया कामांचाही यामध्ये समावेश आहे.महानगरपालिकेत सत्ता मिळावल्यानंतर सत्ताधारी भाजपाने मनपा निवडणूक काळात सत्ता मिळाल्यानंतर महिनाभरात १०० कोटी रुपयांचा निधी शासनाकडून आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार १६ आॅगस्ट २०१८ रोजी शासनाच्या नगरोथ्थान अंतर्गत १०० कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर झाला होता. मात्र, सत्ताधाऱ्यांना हा निधी मंजूर झाल्यानंतर या निधीतून होणाºया कामांसाठीच्या प्रस्ताव तयार करायला चार महिन्यांचा वेळ वाया घातला. यामुळे प्रस्ताव तयार केल्यानंतर शासनाची मंजुरी मिळाली नाही. आता लेकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे शासनाकडून मंजुरी देखील मिळू शकत नाही व निविदा देखील काढली जावू शकत नाही. त्यामुळे या सर्वच कामांना आता विलंब होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच आचारसंहिता शिथील होईल व तेव्हाच कुठे या कामांना सुरुवात होईल.१९६ कोटींची मलनिस्सारण योजनाही रखडलीअमृत योजनेंतर्गत मलनिस्सारण योजनेचे काम तब्बल दीड वर्षांपासून प्रलंबित आहे. जून २०१७ मध्ये मंजूर झालेल्या या योजनेच्या पहिल्या टप्प्याचा कामासाठी जानेवारी २०१८ निविदा काढून जैन इरिगेशनला काम देण्यात आले होते. मात्र, शासनाच्या तांत्रिक समितीने यामध्ये तांत्रिक चूककाढून ही निविदा रद्द करून, नव्याने अंदाजपत्रक काढण्याचा सूचना दिल्या. त्यानंतर २०१८ मध्ये ७ वेळा निविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नाही.८ आॅक्टोबर २०१८रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलनिस्सारण व तर पाईपलाईन टाकण्यासाठी स्वतंत्र निविदा काढण्याचे निर्देश मनपाला दिले. मात्र, यावर देखील महिनाभर कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यानंतर शासनाच्या उच्चस्तरीय समितीने महिनाभरानंतर हे काम नवीन तंत्रज्ञानानुसार करण्याचा सूचना दिल्या.फेब्रुवारी २०१९ मध्ये नवीन तंत्रज्ञानानुसार पहिल्या टप्प्याचे कामाला शासनाने मंजुरी दिली. त्यात मुळ अंदाजपत्रकात ५० कोटी रुपयांची वाढ करुन १९६ कोटी रुपयांचा कामाला मंजुरी दिली. मात्र, या योजनेचा कामाची निविदा अद्याप काढण्यात आली नाही. त्यामुळे हे काम आता आचारसंहितेनंतरच सुरु होणार आहे.मलनिस्सारण व १०० कोटी रुपयांच्या कामांसह सध्या विशेष अनुदान म्हणून मिळालेल्या ५ कोटी रुपयांचा कामांनाही अजून ‘ब्रेक’ लागलेला दिसून येत आहे. शासनाने या कामांना जरी मंजुरी दिली असली कामांसाठी निविदा काढण्यात आली नव्हती. तर २५ कोटी रुपयांमधून ज्या कामांना अद्याप सुरुवात झाली नाही. ती कामे देखील आता रखडणार आहेत. तर मोकाट कुत्र्यांवरील निर्बिजीकरणसह अनेक कामे देखील आता आचारसंहितेमुळे थांबणार आहेत.