शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

आमदारांच्या गावात मतदानावर बहिष्कार

By admin | Updated: February 17, 2017 00:33 IST

तामसवाडी : तब्बल सहा तास बहिष्कार, गारपीटग्रस्त शेतक:यांना नुकसान भरपाई मिळण्याची होती मागणी

पारोळा/तामसवाडी : गारपीटग्रस्त शेतक:यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या तामसवाडी गावातील 153 शेतकरी कुटुंबांनी आज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर सहा तास बहिष्कार टाकला होता. तसेच  ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण केले. निवडणूक निर्णय अधिकारी व आमदार डॉ. सतीश पाटील यांनी उपोषणकत्र्याची समजूत काढल्याने, त्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. 5 मे 2016 रोजी तामसवाडी परिसरात वादळी वा:यासह गारपीट झाली होती. त्यात फळबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसान भरपाईची मागणी करूनही त्याकडे शासनाने लक्ष दिलेले नव्हते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतक:यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. दिलेल्या इशा:यानुसार  आज शेतक:यांनी तब्बल सहा तास मतदानावर बहिष्कार टाकला.ग्रामस्थांच्या उपोषणाची व मतदानावर बहिष्काराची प्रशासनाने तत्काळ दखल घेतली. दुपारी दीड वाजता प्रांताधिकारी राजेंद्र कचवे मंडपात पोहचले. त्यांनी शासनाच्या वतीने शेतक:यांना  मतदान करा बहिष्कार मागे घ्या अशी विनंती केली. तसेच 23 फेब्रुवारीनंतर तुम्हाला शासनाकडून  नुकसान भरपाई मिळवून देऊ, असे आश्वासन दिले. त्यानंतर काही वेळेतच आमदार डॉ. सतीश पाटील  मंडपात पोहचले. त्यांनी प्रांताधिका:यांकडून कशा पद्धतीने कार्यवाही सुरू आहे हे जाणून घेतले.त्यानंतर डॉ. सतीश पाटील म्हणाले की, शासनाला शेतक:यांच्या प्रश्नांकडे लक्ष घालायला वेळ नाही.  शासकीय अधिका:यांकडून गारपीटग्रस्त शेतक:यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी अडचणी येत असतील, तर येणा:या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून सर्व शेतक:यांचे प्रश्न मार्गी लावू. सगळ्यांनी बहिष्कार सोडा आणि मतदान करा. यावर सर्व शेतक:यांचे एकमत झाले. शेतक:यांनी उपोषण व बहिष्कार मागे घेतला. दुपारी दोन वाजेनंतर गारपीटग्रस्त शेतक:यांनी सहकुटुंब मतदान केले. बहिष्कार मंडपात शेतक:यांच्या प्रश्नांना पाठिंबा देण्यासाठी शिक्षकनेते ह.म. पवार, शिवसेना तालुकाध्यक्ष आर.बी. पाटील, पारोळ्याचे अॅड.अण्णासाहेब पवार, नगराध्यक्ष करण पवार आदींनी भेट दिली.या आंदोलनात मनोहर लिंगायत, प्रदीप लिंगायत, सोनू पवार, पवन पवार, रमेश माळी, संभाजी बेलदार, विजय सोनार, भानुदास पवार, आनंदा बिरारी, शिवाजी माळी, संजय बेडिस्कर, प्रकाश पवार, पी.पी.पवार, अण्णा पंडित, श्रीराम पिरन पाटील, शांताराम माळी, देवीदास वाघ, एकनाथ चौधरी, राजधर पवार, डॉ.प्रशांत बागुल, प्रशांत कुलकर्णी यांच्यासह शेकडो शेतकरी यावेळी उपस्थित होते.    (वार्ताहर)जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी चार मतदान केंद्र होते. या ठिकाणी 4951 मतदार होते. नुकसानग्रस्त शेतक:यांव्यतिरिक्त इतर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.4गावात अगदी शांततेत मतदान झाले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस कर्मचा:यांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. दुपारी या नुकसानग्रस्त शेतक:यांनाही आगामी काळात मदत मिळवून देण्याचे आश्वासन मिळाल्याने, त्यांनीही मतदानाचा हक्क बजावला.