शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांच्या बॅगेतही मद्याच्या बाटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 12:54 IST

जळगाव : अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात असलेल्या कोविड व क्वारंटाईन केअर सेंटरमध्ये मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या दोन्ही रुग्णांच्या बॅगेची झडती ...

जळगाव : अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात असलेल्या कोविड व क्वारंटाईन केअर सेंटरमध्ये मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या दोन्ही रुग्णांच्या बॅगेची झडती घेतली असता दारूच्या दोन बाटल्या आढळून आल्या.अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात मनपाच्यावतीने कोविड व क्वारंटाईन केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी अनेक रुग्ण व संशयित रुग्ण मद्याचे घोट रिचवत असल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर याठिकाणच्या सुरक्षा रक्षकांना महापौरांनी प्रत्येक रुग्णांवर लक्ष ठेवण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी दोन कोरोना बाधितांनी मद्याचे घोट रिचवत कोविड केअर सेंटरमध्ये चांगलाच गोंधळ घातला.दोघांनी मागितली माफीकोविड केअर सेंटरमधून याबाबत एका रुग्णाने महापौर भारती सोनवणे यांच्याकडे तक्रार केली असता महापौर त्याठिकाणी पोहचल्या. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे व शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी देखील त्यांच्यासोबत होते. महापौरांनी माहिती घेत दोन्ही रुग्णांना समोर येण्यास सांगितले. सर्व यंत्रणा आल्यामुळे दोन्हीही रुग्ण महापौरांसमोर आल्यानंतर दोन्ही रुग्णांनी माफी मागायला सुरुवात केली. महापौर व इतर नगरसेवकांनी दोन्ही रुग्णांची चांगलीच खरडपट्टी काढली.रिक्षातही मद्यच्या बाटल्यामहापौरांनी सेंटरसमोर असलेल्या रिक्षात तपासणी करायला लावली असता त्यात आणखी दोन दारूच्या बाटल्या सापडल्या. महापौरांनी याबाबत त्याठिकाणी असलेल्या पोलीस कर्मचाºयाला सर्व व्हिडीओ चित्रीकरण पुरावा म्हणून जपून ठेवण्यास सांगितले. दरम्यान, मनपाचे डॉक्टर, सहकारी आणि सुरक्षारक्षकांशी गैरवर्तन केल्याने दोघांची रवानगी जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये करण्यात आली आहे.डब्यांमधून पाठविली जातोय गुटखा- मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना डब्ब्यातून अनेक नातेवाईक गुटखा व इतर अमलीपदार्थ पुरवित असल्याचीही तक्रार काही रूग्णांनी यावेळी महापौरांकडे केली. काही दिवसांपूर्वी विलगीकरण कक्षात तंबाखूजन्य पदार्थ सापडले होते. कोविड सेंटरमध्ये रुग्णांची यापुढे अचानक तपासणी करण्यात येणार असून कोणाकडेही अमली पदार्थ आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. गोंधळ घालणाºया दोघांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मनपा आयुक्तांना सांगितले असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव