भुसावळ : शहरात गावठी कट्टा घेऊन फिरणारा व लोखंडी चॉपर बाळगणारा अशा दोन जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महात्मा फुले नगर येथे गौरव शरद शिरोळे (२२, रा. महात्मा फुले नगर) याच्याकडून पाच हजार किमतीचा गावठी कट्टा जप्त केला. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, संशयित आरोपी गौरव शिरोळे हा महात्मा फुले नगर येथे २५ रोजी सायंकाळी संशयितरीत्या फिरत असताना त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे कमरेवर लावलेला पाच हजार किमतीचा गावठी बनावटीचा काळ्या रंगाचा कट्टा (पिस्टल) सापडून आला.
तसेच संजय जनार्दन इंगळे (वय २०, रा. भारत नगर) याच्याकडून नऊ इंच लांबीचा लोखंडी चॉपर जप्त करण्यात आला आहे.
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मोहम्मदअली सैय्यद, पो. कॉ. साहील तडवी, भूषण चौधरी, पो.कॉ. जितेंद्र सोनवणे, संजय बडगुजर, शेख जाकीर मंसुरी, विकास बाविस्कर यांनी ही कारवाई केली.