जळगाव : गणेश कॉलनीमध्ये जिल्हा बँकेच्या शाखेजवळ पपई खरेदी करताना दुचाकीला टांगलेल्या पिशवीतील तीन लाख 85 हजार 500 रुपये लांबविणा:या दोन्ही चोरटय़ांना जिल्हा पेठ पोलिसांनी सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. अजय बिरजू गारंगे रा.कंजरवाडा (तांबापुरा) व रामप्रकाश तमाईचेकर जामनेवाडा (कंजरवाडा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पपई घेण्यासाठी थांबलेल्या शेतक:याचे लांबविले होते पैसे अजय व रामप्रकाश या दोघांनी बांबरूड ता.भडगाव येथील मूळ रहिवासी असलेल्या संजय पाटील (ह.मु.प्रेमनगर, जळगाव) यांचे कपाशी विक्रीपोटीचे तीन लाख 85 हजार 500 रुपये लांबविले होते. पाटील हे गणेश कॉलनीत रस्त्यालगत असलेल्या विक्रेत्याकडे पपई घेण्यासाठी थांबले. त्यांनी आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली होती. दुचाकीवर त्यांची 12 वर्षीय मुलगीदेखील होती. या दुचाकीच्या क्लचला पैसे ठेवलेली पिशवी टांगली होती. संबंधित मुलीचे लक्ष विचलित करून दोघांनी पिशवी लांबविली होती. शनिवारी सायंकाळी 7.30 वाजता ही घटना घडली होती. वर्णन लक्षात घेता काढला माग संबंधित दोन्ही चोरटय़ांना फिर्यादी संजय पाटील यांच्या मुलीने पाहिले होते. या मुलीसह परिसरातील काही प्रत्यक्षदर्शींकडून चोरटय़ांचे वर्णन लक्षात घेतले. त्यानुसार त्यांचा माग काढला.
कंजरवाडय़ातील दोघांना अटक
By admin | Updated: December 22, 2015 00:59 IST