जळगाव : इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जनरलतर्फे रिंगरोड परिसरातील यशवंत नगरात इनरव्हील बाॅटॅनिकल फॉरेस्ट गार्डन साकारले आहे. यात ३०० औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण केले. यावेळी माजी महापौर सीमा भोळे, भाजपच्या दिप्ती चिरमाडे, महानगरपालिकेचे अभियंता योगेश वाणी यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन अश्विनी गुजराथी, आयपीडीसी व कोषाध्यक्ष मीनल लाठी, पीडीसी व पृथ्वी समन्वयक संगीता घोडगावकर, प्रमुख नेहा संघवी, सचिव इशिता दोशी यांनी उपक्रमाची माहिती दिली. या वेळी गुंजन कथुरिया, कोषाध्यक्ष नेहा नैनानी, डॉ. सिमरनकौर जुनेजा, सदस्या गायत्री कुलकर्णी, पूजा भागवाणी, मोना गांधी, रोशनी चुग, नफिसा लेहरी आदी उपस्थित होते.
या रोपांची केली लागवड
या गार्डनमध्ये अजवाईन, अडुलळा, अर्जुन, बकुल, कडुनिंब, औदुंबर, निलगिरी, वटवृक्ष, पिंपळ यांसह विविध प्रकारच्या तुळशी, कोरफड, लिंबू गवत, पांढरा चंदन, लाल चंदन, पानरुती, पारिजात, गुलमोहर, समुद्र-समान, जिओई, मधुमालती आदीचे वृक्षारोपण करण्यात आले.