शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

बोरी धरणात अवघा ७ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 21:18 IST

  पारोळा : जिल्हायात सर्वत्र पाऊस पडत असून अनेक धरणांतून पाणी ओसंडून वाहत आहे.. मात्र, तामसवाडी येथील बोरी धरणात ...

 

पारोळा : जिल्हायात सर्वत्र पाऊस पडत असून अनेक धरणांतून पाणी ओसंडून वाहत आहे.. मात्र, तामसवाडी येथील बोरी धरणात अवघा ७.५४ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. यामुळे आतापर्यंतच्या पावसाचा धरणावर काही परिणाम झाला नसल्याचे जाणवते.धरणात एकूण ४०.३१ दलघमी साठ्यापैकी उपयुक्त साठा २५.१५ दलघमी तर मृत साठा १५.१६ दलघमी एवढा आहे. ८ आॅगस्टअखेर २६३.२६० दलघमी म्हणजे ४.५४ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. या पाण्यावर पाणी पुरवठा असलेल्या योजनेत तामसवाडी व ४ गावांसाठी ०.६२ दलघमी, बोळे व ६ गावांसाठी ०.४० दलघमी, ढोलीसाठी ०.०२४ दलघमी, तर पारोळा शहरासाठी २.१४ दलघमी पाणी आरक्षित आहे. म्हसवा येथे पाणी पातळी ४२.८९ मीटर, १.४९ टक्के व पाणीसाठा ०.०५१६ दलघमी आहे. भोकरबारी प्रकल्प, कंकराज, शिरसमणी, सावरखेडा, निसर्डी, आर्डी, पिंपळकोठा ल.पा. येथे मृत साठा आहे. बोळे ल.पा. येथे १० टक्के पाणीसाठा आहे.बोरी धरणावर धुळे जिल्ह्यातील फागणे, मुकटीसह २० गावांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून थकीत वीजबिल आणि नादुरुस्त पाईपलाईनमुळे या गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. बाबरेसह बोदगाव कुंदाने, धामणगाव येथील पुरवठाही खंडित झाला आहे.तालुक्यातील शेतक-यांसह शहरी भागातील नागरिकांना धरण भरण्याची सर्व जण आतुरतेने वाट पाहत आहे. गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यात अल्प पर्जन्यमानामुळे बोरी नदीलाही पाण्याचा ओघ कमी झाला. त्याचा परिसरातील बागायती शेतीवर परिणाम झाला आहे.