शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे हेल्पलाईनवर घर व गॅस सिलिंडरची बुकिंग, मोबाइल रिचार्ज अन् बरेच काही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:17 IST

जळगाव : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रवासात कोणतीही अडचण किंवा संकट उद्भवल्यास मदतीसाठी रेल्वे प्रशासनातर्फे १८२ हा टोल ...

जळगाव : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रवासात कोणतीही अडचण किंवा संकट उद्भवल्यास मदतीसाठी रेल्वे प्रशासनातर्फे १८२ हा टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक दिला आहे. मात्र, या हेल्पलाइनवर मदतीऐवजी घर व गॅस सिलिंडरची बुकिंग, मोबाल रिचार्ज करायचे आहे यासारखे प्रश्न विचारले जात आहेत. रोजच्याच या फोन काॅलला नियंत्रण कक्षातील रेल्वे सुरक्षा दलाचे जवान पुरते वैतागले आहेत.

रेल्वेत प्रवासादरम्यान अनेकवेळा प्रवाशांना जागेच्या समस्या येत असतात. तिकीट आरक्षित असतानांही समोरील व्यक्ती जागेवर उठत नसल्यामु‌ळे, अनेक नागरिक रेल्वेच्या हेल्पलाइनवर तक्रार करून रेल्वे पोलिसांकडे मदत मागत असतात. यावेळी नियंत्रण कक्षातील रेल्वे पोलीस तत्काळ गाडीतील रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती देऊन, संबंधित प्रवाशाची तक्रार सोडविण्यासाठी पाठवत असतात. २४ तास प्रवाशांसाठी ही हेल्पलाइन सुरू असते. मात्र, या हेल्पलाइनवर अलीकडे प्रवाशांकडून कुठल्याही प्रकारच्या तक्रारी करण्यात येत आहेत. यामुळे नियंत्रण कक्षातील रेल्वे पोलिसांना या प्रवाशांची समजूत काढतांना, चांगलेच नाकी नऊ येत आहे. मदतीसाठी हेल्पलाइन असतानाही प्रवासी खाण्या-पिण्याच्या ऑर्डरीकडून रेल्वे पोलिसांकडून मदत मागण्याचा प्रयत्न करतात. यामुळे रेल्वे पोलिसांचा वेळ वाया जात असून नाहक त्रास होत आहे. दरम्यान, या तक्रारींची आता नेहमीची सवय झाली असून, मदतीपेक्षा ऑर्डर करणाऱ्यांचेच फोन जास्त येत असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले.

इन्फो :

कुणाला पिझ्झा हवा असतो, तर कुणाला समोसा

भुसावळ येथील नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, प्रवाशांना कुठल्याही मदतीसाठी २४ तास रेल्वेचा नियंत्रण कक्ष सुरू असतो. प्रवाशांची जशी समस्या असते, तशी सोडण्याविण्यात येते. कुणाचे सामान, मोबाइल किंवा इतर वस्तू चोरीला गेल्या, गाडीत वाद झाल्यास, कुणाची तब्येत बिघडल्यास आरपीएफतर्फे तत्काळ मदत पोहचविली जाते. मात्र, या व्यक्तिरिक्त अनेक प्रवाशांकडून जेवण हवे आहे, समोसा हवा आहे, कोल्ड्रिंक्स पाठवा, पिझ्झा पाठवा इतकेच नव्हे तर कुणी मोबाइल रिचार्जसह गॅस बुकिंग करण्याच्या तक्रारींही करत असल्याचे सांगण्यात आले. अशा वेळी रेल्वे पोलिसांकडून मात्र, प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी ही हेल्पलाइन आहे, समोसा किंवा पिझ्झा पाहिजे असल्यास आयआरटीसीकडे जेवणाची ऑर्डर करण्याबाबत सल्ला देण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.

इन्फो :

मदतीसाठी बोटावर मोजण्याइतकेच कॉल

प्रवासात अडचणीत किंवा संकटात असल्याबाबत मदत करण्यासाठी हेल्पलाइन कक्षावर २४ तासात बोटावर मोजण्या इतक्याच प्रवाशांचे कॉल येतात. यामध्ये काही प्रवाशांच्या किरकोळ तक्रारी असतात. तर सर्वांधिक कॉल हे खाण्या-पिण्याच्या मागणीचे असल्याचे सांगण्यात आले.