शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब सापडला...कर्मचाºयांची धावपळ...आगही लागली...अखेर सगळे सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 22:11 IST

मॉकड्रिल: ४० प्रशिक्षीत स्वयंसेवकांनी दाखविले प्रात्यक्षिक

ठळक मुद्दे आपत्कालीन जिन्याने जिल्हाधिकारी उतरले खालीबॉम्ब केला निकामीजखमी व्यक्तीला रोपलँडरच्या सहाय्याने उतरविले खाली

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१३ - दुपारी तीन वाजेची वेळ...स्फोटाचा मोठा आवाज.. बॉम्बस्फोटामुळे मोठी आग लागलीय... घाबरलेल्या अवस्थेत आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाचा कर्मचारी ‘जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात बाँबस्फोट झाल्याची’ माहिती देतो. अन् सर्व संबंधीत यंत्रणेची धावपळ सुरू होते. मात्र घटनास्थळी पोहोचल्यावर सर्वजण सुस्कारा सोडतात. कारण ते असते ‘मॉकड्रील’.दुपारी ठिक तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सायरनच्या आवाज होतो. सायरनमुळे सर्व शाखांमधील महिला व पुरुष अधिकारी, कर्मचारी यांना धोक्याचा इशारा देण्यात येतो. धोक्याचा इशारा मिळताच  सर्व कर्मचारी आपले कामकाज थांबवून, संगणक बंद करुन व शाखेतील विद्युत उपकरणे बंद करुन कार्यालयाच्या बाहेर पडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील मोकळया जागेत एकत्र जमा होतात.  दुपारी तीन वाजून ३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बचाव कार्यासाठी पोलीस अधिक्षक, पोलीस नियंत्रण कक्षातील बॉम्ब शोधक व बॉम्ब विनाशक पथक तसेच जळगाव शहर महानगरपालिका, जैन इरिगेशन, भुसावळ नगरपरिषद, वरणगाव आॅर्डिनन्स फॅक्टरी,  दीपनगर येथील अग्निशमन पथकाच्या गाडया तसेच बचावासाठी जिल्ह्यातील होमगार्ड पथक, जिल्हा सामान्य रुग्णालयातील १०८ क्रमांकाची अ‍ॅम्बुलन्स, रेडक्रॉस सोसायटीची रक्तदान व्हॅन, वैद्यकीय सुविधा घेवून जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या.बॉम्ब केला निकामीदुपारी ३. ३५ वाजता बॉम्ब शोध व विनाशक पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयातील वाहन पोर्चमध्ये ठेवलेला बॉम्ब शोधून त्याला निकामी केला.आपत्कालीन जिन्याने जिल्हाधिकारी उतरले खालीतीन वाजून ४० मिनिटांनी  छतावर लागलेल्या आगीला आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु असतानाच जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर हे इमारतीच्या पाठीमागील बाजूने आपत्कालीन जिन्याने सुखरुप खाली आले. तसेच अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोरील पोर्चचे वरील दुसºया मजल्यावरुन जखमी व्यक्तीला रोपलँडरच्या सहाय्याने खाली उतरविण्यात आले. आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्तीजनक परिस्थितीला कशाप्रकारे सामोरे जायचे याचे मॉकड्रिल पार पडले. सर्वांनी आपली कामगिरी चोख पार पाडल्याबदद्ल जिल्हाधिकारी  सर्वांचे अभिनंदन करीत असतानाच अचानक जिल्हाधिकारी कार्यालयातील एका चिंचेच्या झाडावर साप आढळला. त्यावेळी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी स्नेकस्टिकच्या सहाय्याने सापाला पकडून त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे काम केले. अशाप्रकारे हे मॉकड्रील पार पडले. त्यासाठी अर्जुना बहुउद्देशिय संस्था, भुसावळ, वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव यांचे सहकार्य लाभले.