शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळी नुकसानग्रस्तांना मदत वाटपास दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 00:53 IST

प्रतीक्षा किती : ज्यांनी बँक खाते क्रमांक दिले त्यांना तरी अनुदान तातडीने देण्याची गरज

चोपडा, जि.जळगाव : बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे अनुदान वाटपास दिरंगाई होत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकºयांना प्रथमच मोठी मदत प्राप्त झाली आहे. कापसावर पडलेल्या बोंडअळीने शेतकºयांना जिरायती व बागायती अशा दोन विभागात शासन निदेशानुसार मदत दिली जाणार असून, तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकºयांसाठी एकूण ३४ कोटी रुपये मदत जाहीर झाली आहे. पहिला हप्ता नऊ कोटी रुपये तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत. मात्र हे पैसे येण्यास जवळपास एक महिन्याच्या कालावधी लोटला तरी शेतकºयांना वाटप होत नाही, वाटपास दिरंगाई होत आहे.अशी मिळणार मदतचोपडा तालुक्यात कृषी सहायक तसेच महसूल विभागाच्या क्षेत्रीय अधिकाºयांकडून करण्यात आलेल्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे कापूस पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित शेतकºयाना मदत देण्याबाबत तहसीलदार दीपक गिरासे यांच्याकडे याद्या लवकरात लवकर द्यावयाच्या आहेत. याद्या आल्यानंतर तहसीलदार दीपक गिरासे हे शेतकºयांच्या बँक खात्यात पैसे टाकणार आहेत.बोंडअळी नुकसानग्रस्त शेतकºयांना जिरायती क्षेत्राला हेक्टरी सहा हजार ८०० रुपये, तर बागायती क्षेत्रात १३ हजार ५०० रुपयाची मदत दिली जाणार आहे. जास्तीत जास्त दोन हेक्टरी मदत दिली जाणार आहे.शेतकºयांचा खरीप २०१७ मध्ये सातबाºयावर कापूस नोंद असणे आवश्यक आहे. तसेच बागायती व जिरायती असा उल्लेख असणे आवश्यक आहे. बाधित शेतकºयाच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येणार आहे.जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यात ४४३ कोटी १९ लाख ४७ हजार रुपये रक्कम मंजूर असून, पहिला हप्ता जिह्याला ११८ कोटी १९ लाख अनुदान प्राप्त झाले आहे. त्यात सर्वाधिक जामनेर, चाळीसगाव व नंतर चोपडा तालुक्याला ३३ कोटी रुपये बोंडअळीबाबत मदत जाहीर झाली आहे. अन्य तालुके त्या तुलनेत मागे आहेत.बोंडअळीच्या नुकसानीनंतर मदतीची रक्कम प्रशासनाकडे आलेली आहे. परंतु अनेक शेतकºयांची बँक खाती नंबर प्रशासनाकडे नाहीत. परिणामी अनुदान वाटपाचे काम रखडले आहे. यात ज्या शेतकºयांनी बँक खाती क्रमांक दिलेले आहेत, त्यांनाही अनुदान मदत मिळालेली नाही. किमान त्यांना तरी मदत तातडीने द्यावी, अशी अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :cottonकापूसChopdaचोपडा