बोदवड : शहराला पाणी टंचाईचे ग्रहण लागले असून नेहमीच काही ना काही कारणाने पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. आधी नदीत असलेलेा गाळ व नंतर खंडित वीज यामुळे आता सध्या सलग १७ दिवस झाले तरी पाणीपुरवठा झाला नसल्याने नेहमी प्रमाणेच नागरिकांचे हाल होत आहे.
शहरासह तालुक्यातील तीस गावाच्या नागरिकांना जल संजीवनी देणाऱ्या ओडिए पाणीपुरवठा योजनेच्या
मुक्ताईनगरच्या पूर्णा नदीपात्रात विदर्भात झालेल्या पावसाने गाळ आल्याने ११ पासून पंपाने पाण्याची उचल बंद होती, त्यात मुक्ताईनगर पंपिंग केंद्रावर वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने तासन्तास वीजपुरवठा खंडित होत असतो. १७ रोजी या योजनेचा पाणीपुरवठा सुरळीत होणार होता, परंतु वीज वितरण कंपनीने या योजनेच्या थकीत वीज बिलपोटी वीज जोडणीच बंद करून दिली होती. त्याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ३३ लाख रुपये भरल्याने, रात्री वीजपुरवठा सुरू झाला, मात्र फेरीप्रमाणे तालुक्यातील इतर गावांना पाणी सोडावे लागणार असल्याने बोदवड शहरात २१ रोजी काही अडचण न आल्यास ओडिएचे पाणी सुरळीत होणार आहे,
पावसाळ्याचा महिना अर्धा उटला तरी परंतु शहरवासीयांना काही केल्या पिण्याच्या पाण्याची टंचाईचा त्रास थांबतच नाहीये.
गेल्यावेळी २५ दिवसांनी मिळाले होते पाणी
शहरात गत मे महिन्यात नागरिकांना पंचवीस दिवसांनी पाणीपुरवठा झाला होता. काही प्रभागात तर महिनाभराने नळाला पाणी आले होते. पुन्हा शहरात आज १७ दिवस उलटले असूनही नळाला पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना काही ठिकाणी सार्वजनिक नळावर तर काही ठिकाणी रस्त्याच्या पाईप लाईनच्या गळतीवर पाणी भरून आपली तहान भागवावी लागत आहे.
जामठी रस्त्यावर असलेल्या पाईपलाईनच्या खड्ड्यातून पाणी उपसताना बालक.