शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
3
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
4
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
5
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
6
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
7
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
8
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
9
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
10
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
11
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
12
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
14
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
15
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
16
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
17
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
18
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
19
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
20
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला

बोदवडला नोंदणीच्या ३० टक्केही कापूस खरेदी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 17:23 IST

बोदवडला नोंदणीच्या ३० टक्केही कापूस खरेदी नाही

ठळक मुद्दे साडेतीन हजार शेतकऱ्यांची कापसासाठी नोंदणी

गोपाळ व्यासबोदवड, जि.जळगाव : लॉकडाऊननंतर तालुक्यातील दोन हजार २३५ शेतकऱ्यांनी कापूस नोंदणीसाठी नावे नोंदवली आहेत. बोदवड बाजार समिती अंतर्गत येणाºया उपबाजार समिती मुक्ताईनगर येथे ९७६, वरणगाव येथे १९८ अशी एकूण तीन हजार ४०९ शेतकºयांनी कापूस खरेदी केंद्रावर नोंदणी केली आहे. त्यात आजपावेतो एकूण १० हजार १७१ क्विंटल कापूस खरेदी केंद्राने खरेदी केला आहे.  नोंदणीच्या ३० टक्केही कापूस खरेदी नाहीबोदवड येथील स्टेशन रोडला तसेच दुसरीही जिनिग स्टेशन रोडला केंद्राच्या कापूस खरेदी केंद्राने खासगी जिनिंगवर खरेदी करत आहे. त्यात आजपावेतो ३९० वाहने मोजणीसाठी सोडण्यात आली आहेत. त्यात बोदवडची २७७, मुक्ताईनगर ८२ आणि वरणगावची ३१ अशी वाहने आहेत. सदर दोन ठिकाणी कापूस जात आहे पण त्याची प्रतवारी ठरवण्यासाठी एकच ग्रेडर आहे. त्याचप्रमाणे याच ग्रेडरकडे रावेर तालुक्याचाही अतिरिक्त पदभार आहे.ग्रेडर गणेश कºहाडे हे असून, चांगल्या प्रतीचा कापूस आल्यास भाव पाच हजार ३५५ रुपये लावत असल्याचे सांगितले. मोजणी झालेल्या कापसाला या जिनिंगमध्ये प्रेसिंग करून गठाणी तयार केल्या जात असून, आजपावेतो एका जिनिंगला ११००, तर दुसºया जिनिंगला ७५२ अशा एकूण १,८५२ गठाणी तयार केल्या आहेत.गठाणीसाठी जागा पडत आहे अपूर्णमुक्ताईनगर, बोदवड, वरणगाव या तिन्ही ठिकाणच्या कापसाच्या गठाणी बोदवडलाच तयार होत असल्याने या गठाणी ठेवण्यासाठी जागा अपूर्ण पडत आहे. ताब्यात असलेल्या गोदामापर्यंत वाहतूक करण्यासाठी मजूर वर्गही कमी पडत आहे. तापमान वाढीमुळे जिनिंगचालकांना धोका पत्करून जिनिंग चालू ठेवावी लागत आहे. त्यात अजून नोंदणीच्या ३० टक्के कापूसही मोजला गेलेला नाही.मोताळ्याच्या शेतकºयानेही केली होती नोंदणीबोदवड येथील कापूस विक्रीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील शेतकºयांनी नोंदणी केल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. या शेतकºयास यादीतून वगळण्यात आले.बाजार समितीच्या आवारातून नोंदणीप्रमाणे वाहन सोडत आहे. तसे टोकन शेतकºयांना दिले आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकाºयांच्या आदेशाप्रमाणे शेतकºयांच्या पाहणीसाठी यादी वाचन सुरू आहे.-विशाल चौधरी, प्रभारी सचिव, बाजार समिती, बोदवड

टॅग्स :cottonकापूसBodwadबोदवड