शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

घराजवळील अतिक्रमण काढण्यासाठी तरुणाचा एकट्याने बोदवडला ‘डफ’ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 17:45 IST

घराजवळ एकाने अतिक्रमण करून थाटलेले दुकान तसेच नगरपंचायतीच्या गटारीमुळे घरात शिरत असलेल्या जंतूमुळे त्रस्त युवकाने वारंवार अर्ज करूनही दखल न घेतली गेल्याने शनिवारी बोदवड नगरपंचायतीवर एकट्याने डफ मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन देत जागे करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देनगरपंचायत मुर्दाबादच्या घोषणा देत गावातून डफ वाजवत काढला मोर्चानगरपंचायत कार्यालयासमोर डफ वाजवून प्रशासनाला केले जागेउपनगराध्यक्षांनी स्विकारले निवेदन

आॅनलाईन लोकमतबोदवड, दि.४ : येथील प्रभाग क्रमांक पाच मधील दलित वस्तीत राहणाऱ्या संजय श्रावण बोदडे या तरुणाच्या घराजवळील अतिक्रमण काढले गेले नाही, तसेच गटारीचे पाणी दारापर्यंत पोहचून त्यातील जंतू घरात शिरकाव करीत असल्याबाबत नगरपंचायतीकडे वारंवार अर्ज- विनंत्या करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याच्या निषेधार्थ शनिवारी एकट्याने डफ मोर्चा काढून नगरपंचायतीसमोर डफ वाजवून प्रशासनाला जागे करण्याचे अभिनव आंदोलन केले.बोदडे याच्या घराजवळ नगरपंचायतीची सार्वजनिक गटार दारापर्यंत वाढली असून या गटारीला उंच बांधावे तसेच घरापुढे एकाने रस्त्यावर अतिक्रमण करून दुकान थाटल्याने या दुकानाचे अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या वर्षभरापासून अर्ज करीत पाठपुरावा केला. परंतु नगरपंचायतीकडून काहीच हालचाल होत नसल्याने आणि सदर तरुणाच्या घरात गटारीच्या पाण्यातील जंतू जात असल्याने त्याने गेल्या आठ दिवसांपूर्वीही प्रशासनाला निवेदन दिले होते. पण काहीच हालचाल होत नसल्याने या तरुणाने शनिवारी दुपारी बारा वाजता बोदवड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून नगर पंचायत कार्यालयावर एकट्याने ‘डफ’ वाजवत नगरपंचायत मुर्दाबादच्या घोषणा देत मोर्चा काढला. नगर पंचायत कार्यालयावर पोहचल्यावर त्याने तेथे डफ वाजवून प्रशासनाच्या कानात आवाज करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला.सदर युवक डफ वाजवित नगरपंचायतीत गेल्यावर मुख्याधिकारी शासकीय कामानिमित्त बाहेरगावी गेले असल्याने या विषयाशी संबंधीत बांधकाम अभियंता देवेंद्र शिंदे, उपनगराध्यक्ष नितीन चव्हाण यांनी निवेदन स्वीकारत गटारीचे काम करून देण्याचे आश्वासन दिले आहे. 

टॅग्स :Morchaमोर्चा