शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बहरलेली झेंडूची फुले, झाडे लॉकडाऊनमुळे उपटून फेकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 15:24 IST

लॉकडाऊनमुळे फुलांना खरेदीदार मिळत नाही. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा फटका ।कोरोनाचा फुल शेतीला मोठा फटकातोडणीस आलेल्या फुलांचे मोठे नुकसानखरेदीदार मिळेना

चंद्रमणी इंगळेहरताळा, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : यंदा हरताळे शिवारात पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांची लागवड केली होती. फुलांची शेती चांगलीच बहरली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे फुलांना खरेदीदार मिळत नाही. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सध्या झेंडूची फुले, झाडेच उपटून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.हरताळा शिवारातील गट नंबर ८०/१ मध्ये युवराज रामकृष्ण चोपडे यांनी एक एकर क्षेत्रात झेंडूच्या फुलांची लागवड केली होती. चांगला पाऊस आणि योग्य संगोपन यामुळे झेंडूचे पीक चांगलेच बहरले. मात्र तोडणीच्या वेळी लॉकडाऊनचा फटका या शेतकºयाला बसला आहे. सध्या कुणीही खरेदीदार मिळत नसल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकºयाने सांगितले की, पाण्याची सुविधा असल्यामुळे फुल शेती यंदा चांगली बहरली. मात्र पहिल्यांदाच अशा परिस्थितीचा सामना करीत असल्याने झेंडूची शेती चांगली बहरल्याने तोडणी गरजेची आहे. पण कुणी खरेदी करण्यास तयार नसल्याने फुले, झाडे उन्हामुळे सुकत असून, झाडेही उपटून फेकण्याची वेळ आली आहे. सुकलेली फुलदाणी उपटून फेकली. विशेष म्हणजे कोणतेही संकट आले तरी फुलांची विक्री बंद होत नव्हती. मात्र यावेळी लॉकडाऊनमुळे श्रीक्षेत्र मुक्ताई मंदिर, हरताळे मंदिर, चांगदेव महाराज मंदिर तसेच संस्थांना विक्री होणारी तसेच तालुक्यावरील वितरकांची फुल विक्रीची बंदी यामुळे सगळीकडील मागणी बंद झालेली आहे.महत्वाचे म्हणजे भर उन्हाळ्यातील लग्न समारंभ, यात्रा, सत्यनारायण महापूजा, वास्तुशांती, जागरण गोंधळ, उद्घाटन, महापुरुष जयंती विशेष, सप्ताह आदी कार्यक्रम बंद आहेत. परिणामी फुले शेतातच खराब झाली. त्यामुळे सुरुवातीला खरीप व आता रब्बी हंगामापासूनही वंचित राहिल्याने व फुलशेतीनेही धोका दिल्याने चांगलीच कोंडी झाली आहे. यासाठी पंचनामा करून आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली आहे.लॉकडाऊनमुळे फुल विक्री बंद आहे. परिसरातील सर्वच शेतकºयांची फुले शेतात पडून आहे. त्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. फुल शेतीसाठी केलेला खर्चसुद्धा निघाला नाही. तसेच फुल शेतीसाठी राखून ठेवलेल्या जमिनीत व रब्बीचा हंगाम गेल्याने नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक लाभ मिळणे गरजेचे आहे.-युवराज रामकृष्ण चोपडे, शेतकरी, हरताळा, ता.मुक्ताईनगर 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuktainagarमुक्ताईनगर