शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमसंबंधाच्या संशयावरून खून

By admin | Updated: February 3, 2017 00:57 IST

अंजाळे : तीन जण ताब्यात

यावल : विवाहितेशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून  धनराज त्र्यंबक सपकाळे (वय 45, रा. अंजाळे, ता. यावल) यांचा खून करण्यात आला. ही घटना बुधवारी  मध्यरात्री अंजाळे शिवारातील मोर नदीवरील पुलाजवळ उघडकीस आली. याप्रकरणी तीन संशयिताना ताब्यात घेण्यात आले आहे.   पोलीस सूत्रांनुसार, विजय त्र्यंबक सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा भाऊ मयत धनराज सपकाळे हा बुधवारी   त्यांच्या शेतात  ट्रॅक्टर (एमएच-19-एए-7028) वरून शेतातील शेत तळ्याची माती नागरणीचे काम करीत होता. तो रात्री 11 वाजेपावेतो घरी परतला नाही.  त्याची प}ी संगीता सपकाळे यांनी धनराज परतला नाही व मोबाइलदेखील उचलत नाही, असे सांगितले. तेव्हा विजय सपकाळे स्वत: त्यांचा शोध घेतला असता रात्री 11.30 वाजेच्या सुमारास गावातील संशयित पंढरीनाथ तुळशीराम सपकाळे, पप्पू भास्कर सपकाळे व अन्य एक अनोळखी असे तिघे एका दुचाकीवर जोरात जाताना दिसले व पुढे पुलावरच कपाळास जबर दुखापत होऊन  मृतावस्थेत धनराज आढळून आला. या तिघांनीच धनराज याची हत्या केली असावी, असा  संशय व्यक्त करीत गुरुवारी यावल पोलिसात तिघा  संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस  निरीक्षक बळीराम हिरे, साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे, हवालदार संजीव चौधरी करीत आहे. गुरुवारी यावल  ग्रामीण रुग्णालयात डॉ. कौस्तुभ तळेले यांनी शवविच्छेदन केले. (वार्ताहर)