शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा बस स्थानकाजवळ घाण पाण्याने नाला झाला ब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 20:51 IST

नाल्याच्या वरून पाणी : एक जखमी, प्रवाशांची कसरत

पारोळा : पारोळा येथील बस स्थानक परिसरातील बोगद्याजवळील नाल्यात घाण अडकल्याने नाला ब्लॉक झाला आहे. त्यावरून पाणी वाहत असल्याने एक नागरिक पडून जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली.शहरातील बस स्थानकातून बाजारपेठ व गावात जाण्यासाठी असलेल्या बोगद्याजवळील रस्त्यावर नाला आहे. पावसामुळे नाल्यातील पाईपमध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून घाण अडकलेली आहे. त्यामुळे नाल्याचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. वाहत्या पाण्यामुळे नाल्याच्या ढाप्याच्या आजूबाजूला खड्डे पडले आहेत. या परिसरातून दिवसातून हजारो लोक वावरतात. नागरिकांना वाहत्या पाण्यातून रस्ता काढावा लागत आहे. तसेच पाऊस पडल्यानंतर परिसरात दोन ते तीन फुटापर्यंत पाणी साचलेले असते. त्यामुळे बस स्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांचे व नागरिकांचे हाल होत आहेत.इतकेच नव्हे, तर नगरपालिकेचे काही कर्मचारीदेखील बाहेरगावाहून अप-डाऊन करतात. त्यांनीदेखील संबंधित विभागाला या प्रकाराबाबत कळविले नाही. याबाबत बस स्थानक प्रशासनानेही उपाययोजना करण्याचे मनावर घेतले नाही हे विशेष.

लोकमत न्यूज नेटवर्कपारोळा : पारोळा येथील बस स्थानक परिसरातील बोगद्याजवळील नाल्यात घाण अडकल्याने नाला ब्लॉक झाला आहे. त्यावरून पाणी वाहत असल्याने एक नागरिक पडून जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली.शहरातील बस स्थानकातून बाजारपेठ व गावात जाण्यासाठी असलेल्या बोगद्याजवळील रस्त्यावर नाला आहे. पावसामुळे नाल्यातील पाईपमध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून घाण अडकलेली आहे. त्यामुळे नाल्याचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. वाहत्या पाण्यामुळे नाल्याच्या ढाप्याच्या आजूबाजूला खड्डे पडले आहेत. या परिसरातून दिवसातून हजारो लोक वावरतात. नागरिकांना वाहत्या पाण्यातून रस्ता काढावा लागत आहे. तसेच पाऊस पडल्यानंतर परिसरात दोन ते तीन फुटापर्यंत पाणी साचलेले असते. त्यामुळे बस स्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांचे व नागरिकांचे हाल होत आहेत.इतकेच नव्हे, तर नगरपालिकेचे काही कर्मचारीदेखील बाहेरगावाहून अप-डाऊन करतात. त्यांनीदेखील संबंधित विभागाला या प्रकाराबाबत कळविले नाही. याबाबत बस स्थानक प्रशासनानेही उपाययोजना करण्याचे मनावर घेतले नाही हे विशेष.

सायकलस्वार जखमीया पाण्यातून जात असताना काहीजण पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. १६ सप्टेंबर रोजी येथील सायकलस्वार विनायक पाटील हे या घाण पाण्यातून मार्ग काढत असताना खड्ड्यात पडले. त्यांच्या तोंडाला व नाकाला जबर जखम झाली. अशा घटना सातत्याने घडत आहेत. तरीदेखील पालिकेकडून घाण काढली जात नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. या नाल्यात कचरा, प्ल्ॉस्टिच्या वस्तू आहेत. त्यामुळे तो ब्लॉक होऊन घाण पाणी साचले आहे. मात्र पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. पालिकेने नाल्यातून घाण काढावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

सर्वत्र जोरदार पाऊस आहे त्यामुळे कामाला विलंब झाला असेल, याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना करून लवकरात लवकर नाला साफ केला जाईल.-व्ही.एम.इन्सुलकर, आरोग्य निरीक्षक, नगरपालिका, पारोळा