शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

एकाच रात्री आठ ठिकाणी घरफोडय़ा

By admin | Updated: January 16, 2017 00:40 IST

कळमसरे/चोपडा : सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

कळमसरे, ता.अमळनेर/चोपडा : मकरसंक्रांतीच्या रात्री कळमसरे, ता. अमळनेर येथे सहा, तर चोपडा येथे दोन ठिकाणी घरफोडय़ा झाल्या. दोन्ही ठिकाणी सुमारे सव्वादोन लाखांचा ऐवज चोरटय़ांनी लांबविला.कळमसरे येथील बसस्थानक चौकात असलेली सहा दुकाने चोरटय़ांनी फोडली. यात चोरटय़ांनी बिअरच्या बाटल्यांसह सुमारे 70 ते 75 हजारांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. बाबूलाल यशवंत पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यात त्यांच्या मालकीच्या  त्रिमूर्ती बिअरबार दुकानाचे चोरटय़ांनी कुलूप तोडून रोख रक्कम व दुकानातील बिअरच्या बाटल्यांसह 49 हजार 150 रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यांच्या दुकानासमोरील म्हाळसा ट्रेडर्समधून तीन हजार रुपये रोख, मुक्ताई पान दुकानातून चार हजार रुपयांची चिल्लर, गुरुदत्त पानटपरीतून सिगारेट्सचे डबे, पंकज हरकचंद छाजेड यांच्या किराणा दुकानातून तीन हजार रुपये रोख, तर वैशाली ङोरॉक्समधून 200 ते 300 रुपये चोरून नेले. शहापूर रस्त्यालगत वासरे फाटय़ाजवळ रिकाम्या बिअरच्या बाटल्या आढळून आल्या. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार कंखरे करीत         आहेत. चोपडा- शहरातील गंगाईनगर भागातील बंद घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी दीड लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम लंपास केली. प्लॉट क्रमांक 35 मधील घरमालक व भाडेकरू दोन्ही बाहेरगावी गेले होते. ही संधी साधत चोरटय़ांनी 14 रोजी रात्री 10 ते 15 रोजी सकाळी 8.30 वाजेदरम्यान घरफोडी केली. यात  महेंद्र  भगवानसिंग गिरासे यांच्या घरातील लाकडी कपाटात ठेवलेले 1 लाख चार हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व  16 हजार रोख असा एकूण 1 लाख 20  हजार 200 रुपयांचा ऐवज लंपास केला. तर त्यांचे भाडेकरू मच्छिंद्र पाटील यांच्या घरातील 23 हजार रुपयांचे दागिने व अडीच हजार रुपये रोख असा एकूण 25 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. (वार्ताहर)