शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाला युतीधर्माची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 11:21 IST

तालुका वार्तापत्र : एरंडोल

ठळक मुद्देस्वकियांची नाराजी दूर करण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार

एरंडोल : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या एरंडोल तालुक्यात भाजपाला शिवसेनेकडून युती धर्म पाळला जाईल अशी अपेक्षा आहे.एरंडोल तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानण्यात येतो. शिवसेनेचे मजबूत संघटन पाहता या निवडणुकीत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार चिमणराव पाटील, माजी विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश महाजन, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर व राजेंद्र चौधरी, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, जि.प.चे माझी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले व इतर पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन भाजपा उमेदवार स्मिता वाघ यांना प्रचार यंत्रणा राबवावी लागणार आहे.भाजपाचे संघटन मंत्री अ‍ॅड.किशोर काळकर हे स्थानिक असल्यामुळे त्यांचे लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत.एरंडोलचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेशसिंह परदेशी हे भाजपाचे आहेत. भाजपाचे तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील यांचे पक्षसंघटनेला बळकटी देण्याचे काम व त्यांचा जनसंपर्क याचा लाभ भाजपा उमेदवाराला कितपत होतो हे मतदान यंत्रातच समजेल.धरणगाव-एरंडोल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद हे भाजपाचे संभाजी चव्हाण यांच्याकडे आहे. याशिवाय तालुक्यातील ५२ पैकी १७ ग्रामपंचायतींचे सरपंच भाजपाचे आहेत तर बहुतांश ग्रामपंचायतींचे सरपंचपद शिवसेनेकडे आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी तालुक्यात आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन संपर्क अभियान राबविले. आमदार डॉ.सतीश पाटील व त्यांच्या टीममधील अमित पाटील, तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुखप्रमुख पराग पवार, आर.ए.शिंदे, डॉ.राजेंद्र देसले यांनी कामाला सुरुवात केली आहे.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन, सुकलाल महाजन, योगेश महाजन, डॉ.भूषण पाटील, संजय भदाणे व इतर पदाधिकाऱ्यांकडून आघाडीचा धर्म पाळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.दरम्यान, दोन्ही उमेदवारांचा एरंडोल तालुक्याशी जवळचा संबंध नसला तरी त्यांच्या पक्षाचे व मित्र पक्षाचे नेते व त्यांचे नेटवर्क कामाला येणार आहे.

टॅग्स :Politicsराजकारण