शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

भाजपने राखला विजयाचा गड

By admin | Updated: May 17, 2014 00:06 IST

धुळे : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात मित्रपक्षासह भाजप युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी अभूतपूर्व एक लाख ३० हजार ७२३ मताधिक्याने विजय मिळविला.

 धुळे : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात मित्रपक्षासह भाजप युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी अभूतपूर्व एक लाख ३० हजार ७२३ मताधिक्याने विजय मिळविला. काँग्रेस आघाडीचे उमेदवार अमरिशभाई पटेल यांना या निवडणुकीत सलग दुसर्‍यांदा पराभव पत्करावा लागला. निवडणूक आयोगाने व प्रशासनाने कायदा- सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विजयी मिरवणुकीस परवानगी नाकारल्याने युतीच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. या निवडणुकीसाठी १९ उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी २४ एप्रिलला ५८.५२ टक्के मतदान झाले. यानंतर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात आज मतमोजणी झाली. डॉ. भामरे विजयी झाल्याची दुपारी पावणेतीनला घोषणा झाली. आतापर्यंत लोकसभेच्या झालेल्या १६ निवडणुकांमध्ये सर्वाधिक मते आणि मताधिक्य मिळविण्याचा बहुमान भामरे यांना मिळविला आहे. पहिल्या फेरीपासून अंतिम २७ व्या फेरीपर्यंत भामरे यांची मताधिक्यात आघाडी कायम राहिली. काँग्रेस आघाडीचे उमेदवार पटेल यांना एकमेव मालेगाव शहरातच मताधिक्य मिळाले. स्वातंत्र्यापासून कायम राखीव संवर्गासाठी असलेला हा मतदारसंघ २००९ ला खुल्या गटासाठी झाला. ही संधी साधून त्या वेळी काँग्रेसचे नेते अमरिशभाई पटेल यांनी नशीब अजमावले होते. पण त्यांना गटबाजीसह जातीय समीकरणांमुळे पराभवास सामोरे जावे लागले होते. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा पटेल यांना काँग्रेसमध्ये एकमताने उमेदवारी बहाल झाली. पण त्यांना मतदारांनी स्वीकारले नाही. भाजपचे प्रताप सोनवणे २००९ मध्ये फक्त १९ हजार ४१९ मतांनी खासदार झाले होते. मोदी यांची लाट आणि काँग्रेस आघाडीच्या गटातटाच्या राजकारणाला कंटाळलेल्या मतदारांनी, पडद्याआडून काही राजकीय पदाधिकार्‍यांनी थेट नेत्यांना धडा शिकविण्यासाठी डॉ. भामरे यांच्या पारड्यात मते टाकली. त्यामुळे पटेल यांच्यासह आघाडीच्या स्थानिक नेत्यांचे विविध दावे, विविध समाजाचा पाठिंबा मिळविण्यासाठी झालेली धडपड किती तकलादू, पोकळ निघाले, हे या निकालावरून दिसून येते. हिरे महाविद्यालयातील मतमोजणी केंद्रात युतीच्या कार्यकर्त्यांचा आनंद वाढत गेला, तर आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतल्याचे चित्र होते. शहरात ठिकठिकाणी भामरे यांच्या विजयामुळे तूफान आतशबाजी झाली. मतदारसंघातील युतीचे आमदार, पदाधिकारी जल्लोषात सहभागी झाले.