शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा उमेदवाराबाबत अनिश्चिता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 12:58 IST

जळगाव लोकसभा मतदार संघ

ठळक मुद्दे राष्ट्रवादीकडून प्रचार सुरु, दुसरीकडे प्रतीक्षा

हितेंद्र काळुंखे ।लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : लोकसभा निवडणुकीची रविवारी घोषणा झाली. सत्ताधारी भाजपाकडून जिल्ह्यातील जळगाव मतदारसंघासाठी उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाही. तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसने जळगाव लोकसभा मतदार संघासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची उमेदवारी काही दिवसांपूर्वीच जाहीर केली. त्यांनी प्रचार देखील सुरु केला आहे.भाजपाचे दोन्ही खासदार वगळले जाण्याची शक्यताजळगाव लोकसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षांपासून भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाचे ए.टी.पाटील हे विद्यमान खासदार आहे. सलग दोन वेळेस ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत.असे असतानाही ‘अंतर्गत’कारणामुळे त्यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे.जळगाव लोकसभा मतदार संघात खासदार ए. टी. पाटील यांच्या जागी बांधकाम व्यावसायिक प्रकाश पाटील या नव्या कोऱ्या उमेदवारासाठी जलसंपदा गिरीश महाजन यांच्या गटाकडून प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे भाजपाचे अध्यक्ष उदय वाघ यांचे देखील प्रयत्न सुरू आहेत. या दोघांपैकी कोणास तिकीट मिळते याबाबत पक्षात उत्सुकता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी प्रचार सुरु केला असला तरी काँग्रेसने ते आम्हाला विश्वासात घेत नसल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे आगामी राजकारणाची झलक यातून पहायला मिळत आहे.जळगाव लोकसभा मतदार संघात गेल्या निवडणुकीत १६ लाख५९ हजार ९७८ इतकी मतदार संख्या होती. गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत भाजपाची आणि सेनेची युती तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचीही आघाडी नव्हती.अशी स्थिती असताना विधानसभा संघ निहाय जळगाव शहर भाजपा, जळगाव ग्रामीण शिवसेना, अमळनेर भाजपा समर्थक अपक्ष, एरंडोल राष्ट्रवादी, चाळीसगाव भाजपा, पाचोरा शिवसेना असे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे आता भाजपा कधी उमेदवार जाहीर करतो, याकडे लक्ष लागून आहे.जळगाव जिल्ह्यात सुरुवातीस १९५२ पासून जळगावचा काही भाग धुळ्याला जोडून एक मतदार संघ तर काही भाग बुलढाण्याला जोडून दुसरा मतदार संघ होता. त्यानंतर १९७७ पासून जळगाव आणि एरंडोल असे दोन लोकसभा मतदार संघ अस्तित्वात आले. या मतदार संघांची पुनर्रचना सन २००९ मध्ये होवून एरंडोलचा जळगाव आणि जळगावचा रावेर लोकसभा मतदार संघ तयार झाला.

टॅग्स :Politicsराजकारण