शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंच्या कार्यक्रमात भाजपचे पदाधिकारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 23:05 IST

मुक्ताई साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ : राष्ट्रवादी अध्यक्षांची भाजपवर जोरदार टीका

मुक्ताईनगर : येथील संत मुक्ताई साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम एकनाथ खडसे यांच्या हस्ते झाला. यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारीही उपस्थित होते. यामुळे पुन्हा चर्चेचा विषय झाला. यावेळी नगराध्यक्षा नजमा तडवी,  बोदवड बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जि. प. सदस्य वैशाली तायडे , निलेश पाटील, कैलास सरोदे तसेच बोदवड पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सावळे व भाजपाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  या कारखान्यावर खडसेंचे वर्चस्व असल्याने आता हा कारखाना राष्ट्रवादीच्याच ताब्यात आला असे म्हणता येईल, मात्र भाजपचे उपस्थित अनेक पदाधिकारी यांनी भाजप सोडल्याचे जाहीर न करता खडसेंच्या सोबतच ते दिसून लागल्याने नक्की भूमिकाही जाहीर होत नसल्याने चर्चा रंगत आहे.सदर प्रसंगी  माजी मंत्री एकनाथर खडसे व  मंदाकिनी खडसे यांच्या हस्ते  शुभारंभ झाला.  बॉयलर अग्नी प्रदिपन जिल्हा बॅंकेच्या चेअरमन रोहिणी खडसे -खेवलकर यांच्या हस्ते झाला तर अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव  भगवानराव जाधव  होते. माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराभी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील,   काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, चोपड्याचे माजी आमदार  कैलास  पाटील , विनोद तराळ, आणि सर्व लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी वनिता गवळे, विनोद पाटील, प्रदीप साळुंखे, गणेश पाटील, ईश्वर राहणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, तालुकाध्यक्ष यु.डी. पाटील, साहेबराव सिंगतकर, विशाल खोले महाराज,शाहिद खान, किशोर चौधरी, वसंत पाटील, कल्याण पाटील, देवेंद्र खेवलकर, आबा माळी,दिपक झाबड,प्रमोद धामोळे , रामदास पाटील, मधुकर राणे,कैलास चौधरी, विनोद कोळी,सईद बागवान,अशोक लाडवंजारी, सुनील माळी, हाजी मुन्ना तेली विलास धायडे, दशरथ कांडेलकर, शिवाजी पाटील,रामभाऊ पाटील,राजू माळी,विश्वनाथ चौधरी, बि सी महाजन, योगेश कोलते, पांडुरंग नाफडे,आदी उपस्थित होते.सदर    कार्यक्रमाच्या  यशस्वीतेसाठी देवरे, रवी भोसले, पंकज पाटील व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.सर्वांना सहकार्य करण्याचे केले आवाहनयावेळी एकनाथराव खडसे म्हणाले की,  गेले तीस वर्षांपासून मी आमदार आहे मंत्रीही झालो. त्यामुळे आता पदाची अपेक्षा नसून मी मतदारसंघात, जिल्हयात सुरू केलेले, आणि प्रस्तावित केलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पक्षांतर केले आहे. ते पूर्ण करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल. त्यासाठी आपल्या सर्वांच्या  सहकार्याची गरज आहे. तर कारखाना व्यवस्थापनाने नविन ऊस लागवडीकरीता शेतकी विभागामार्फत यावर्षी मागील वर्षाप्रमाणे कारखान्याकडुन एकरी १.५ मे.टन बेणे वसुलप्राप्त पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात येत असुन सदर योजनेचा कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी  पुरेपुर लाभ घ्यावा असे आवाहन एकनाथ खडसे यांनी केले.