शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
3
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
4
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
5
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
6
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
7
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
8
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
9
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
10
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
11
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
12
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
13
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
14
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
15
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
16
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
17
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
18
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
19
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
20
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची

काँंग्रेससह भाजपाला आंतरमशागतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 11:40 IST

तालुका वार्तापत्र : बोदवड

ठळक मुद्देनिवडणूकपूर्व हालचाली गतिमान : बहुतांश ठिकाणी भाजपाचे वर्चस्व

बोदवड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोदवड तालुक्यामध्ये बैठका आणि राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे. आगामी काळात बोदवड तालुक्यातील वर्चस्वासाठी काँग्रेससह भाजपाला आंतर मशागतीची गरज भासणार आहे.बोदवड तालुक्यात जि.प.चे दोन गट तर चार गण आहेत. सन २०१४ मध्ये जिल्हा परिषदेच्या शेलवड गटात राष्ट्रवादीचे तर नाडगाव गटात भाजपचे वर्चस्व राहिले आहे. आज घडीला घड्याळाचे काटे पूर्ण फिरून दोन्ही गट व चारही गणात भाजप ने वर्चस्व प्रस्तापित केले आहे. अंतर्गत कलहामुळे अनेक वेळा पक्षाच्या बैठकीत वाद झाले. बूथ निहाय बैठकीचे माहिती पत्रक वेळेवर मिळाले नाही, कधी कामगिरीची आकडेमोड जुळली नसल्याने स्वत: पक्षनेत्यांसमोर हा वाद उफाळून आला होता. कधी पक्षाच्या बैठकीत जेवणाच्या ताटावरून वाद झाले तर वर्गणी करून जेवण दिले या तक्रारी सुद्धा नेत्यापर्यंत पोहचल्या होत्या.दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोश आणण्याची गरज आहे. राष्ट्रवादीने ही नगरपंचायतीमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र सेनेने आमदारकीत तालुक्यातून सर्वधिक मतदान घेतले होते. भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या चारही पक्षांना आता जमिनीवर येऊन परिश्रम घ्यावे लागणार अशी परिस्थिती आहे. भाजपने विकास कामाची पुस्तिका तालुक्यात घरोघर पोहचवित प्रचार आघाडी सुरू केली आहे. पक्ष कार्यकर्त्याच्या बैठकीला सुरवात ही झाली आहे. आता रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरणपक्षीय बलाबलबोदवड नगरपंचायती वर सध्या भाजपची सत्ता आहे. त्यात सतरा नगरसेवकांपैकी आठ नगरसेवक भाजपाचे तर एक सेनेचा आहे. त्याचे पाठबळ भाजपला आहे. काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचे चार, तर राष्ट्रवादीला पाठींबा असलेले दोन अपक्ष असे समीकरण आहे.पंचायत समितीच्या चार ही गणांमध्ये भाजप तर जिल्हा परिषदेच्या दोन्ही गटात भाजपचे सदस्य आहे, अशी स्थिती तालुक्यात आहे.

टॅग्स :Politicsराजकारण