शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.तील समित्यांची यादी एका भाजपा नेत्याकडे

By admin | Updated: April 22, 2017 13:02 IST

कुठल्या सदस्याला कुठल्या समितीवर घ्यायचे हे निश्चित करण्यासंबधी भाजपाच्या एका नेत्याकडे ही यादी असून, याच नेत्याकडे नियोजन सुरू असल्याची माहिती आहे.

जळगाव : जिल्हा परिषदेतील 10 समित्यांवर कुठल्याही सदस्याची नियुक्ती शुक्रवारीही झाली नाही. परंतु कुठल्या सदस्याला कुठल्या समितीवर घ्यायचे हे निश्चित करण्यासंबधी भाजपाच्या एका नेत्याकडे ही यादी असून, याच नेत्याकडे नियोजन सुरू असल्याची माहिती आहे. या नेत्याकडे जि.प.तील विरोधी पक्षातील एक गट अलीकडेच जाऊन आला. या गटालाही कुठलीही माहिती संबंधित नेत्याकडून मिळाली नाही. चहा, पाण्याविना या गटाला संबंधित नेत्याच्या निवासस्थानातून परतावे लागल्याची कुजबूज जि.प.मध्ये सुरू आहे. समित्यांवर सदस्यांच्या नियुक्तीचे अधिकार गटनेत्यांनी अध्यक्ष यांना दिल्याने आपली कुठल्या समितीवर नियुक्ती झाली याची माहिती घेण्यासाठी मात्र अनेक सदस्य अध्यक्ष यांच्या जि.प.तील कार्यालयात येत आहेत. भाजपातील एक गट अलिप्तसमित्यांमध्ये सदस्य नियुक्ती झालेली नसतानाच येत्या 29 रोजी स्थायी समितीची सभा निश्चित केली आहे. सदस्य नसले तर ही सभा तहकूब होईल. समित्यांवर सदस्यांच्या नियुक्तीवरून भाजपामध्ये गटबाजी वाढली असून, एका गटातील सदस्यांनी या प्रक्रियेपासून दूर राहणेच पसंत केले आहे. समितीवर नियुक्तीसंबंधी नियोजन करीत असलेल्या नेत्याकडे या गटातील कुठलाही सदस्य गेलेला नाही. अर्थातच यामुळे भाजपातील एका गटाला स्थायी, बांधकाम व जलव्यवस्थापन या महत्त्वाच्या समित्यांपासून दूर ठेवण्याची खेळी सुरू असल्याची माहिती आहे.